कोकण

‘इंग्लिश स्पीकिंग’ उपक्रमाचे कासार्डे केंद्रशाळेत उद्‍घाटन

CD

04701

‘इंग्लिश स्पीकिंग’ उपक्रमाचे
कासार्डे केंद्रशाळेत उद्‍घाटन

सकाळ वृत्तसेवा
तळेरे, ता. १६ : कासार्डे गावाचे सुपुत्र, उपमुख्य कार्यकारी अधिकारी जयप्रकाश परब यांच्या संकल्पनेतून एकलव्य अकादमीतर्फे शनिवारी (ता. १५) कासार्डे केंद्रशाळा येथे ‘इंग्लिश स्पीकिंग’ या नावीन्यपूर्ण उपक्रमाचा प्रारंभ करण्यात आला. यावेळी विविध अधिकारी, पालक, ग्रामस्थ, मुख्याध्यापक उपस्थित होते. हा प्रकल्प कासार्डे गाव मर्यादित सुरू केला आहे.
या कार्यक्रमाला उद्‍घाटक आणि संकल्पना मांडणारे जयप्रकाश परब, सरपंच निशा नकाशे, उपसरपंच गणेश पाताडे, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष प्रमोद शेट्ये, उपाध्यक्षा श्रेया परब, उद्योजक प्रणिल शेट्ये, तंटामुक्ती अध्यक्ष प्रकाश तिर्लोटकर, शिक्षण विस्तार अधिकारी कैलास राऊत, केंद्रप्रमुख संजय पवार, शांतीलाल मुथा फाउंडेशनच्या तालुका समन्वयक पल्लवी सोवनी, संतोष पारकर, तळेरे बीटमधील मुख्याध्यापक, पदवीधर शिक्षक आणि उपशिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते. एकलव्य अकादमीच्या संस्थापक रेश्मा दाभोलकर-डामरी यांनी इंग्रजी भाषेच्या व्यावहारिक महत्त्वावर भर दिला. अकादमीचे व्यवस्थापक सुयश तांबट व वैभवी बुकम यांनीही सहभाग घेतला. जयप्रकाश परब यांनी ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी अशा भाषिक कौशल्याचे महत्त्व विशद केले. कासार्डे केंद्राचे मुख्याध्यापक आनंद तांबे यांनी सूत्रसंचालन केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

दिल्लीत सुरू होणार मोठं मिशन; भारतात का येतेय ही अवकाश गुप्तचर कंपनी? छोट्या उपग्रहांची मोठी तयारी

IND vs SL 2nd Test: भन्नाट,भन्नाटssss! यशस्वी जैस्वालचा हा कॅप पाहाच, श्रीलंकेच्या ओपनरला झोप लागली नसेल Video Viral

Devendra Fadnavis: महिला आरक्षण २०३४ पर्यंत ढकलण्याचा प्रयत्न; विरोधक महिलांना आरक्षणापासून रोखताहेत, मुख्यमंत्री फडणवीसांचा आरोप

Marathi News Live Updates : साखरेच्या दरवाढीत २२ ते २५ हजार कोटींचा घोटाळा? राजू शेट्टींचा गंभीर आरोप

Raju Shetty: देशात ४८ लाख टन साखर गायब; २० हजार कोटींच्या गैरव्यवहाराचा राजू शेट्टींचा आरोप, प्रतिटन ५ हजार रुपये द्यावेत

SCROLL FOR NEXT