IND VS SL 2ND TEST: YASHASVI JAISWAL TAKES STUNNING CATCH
esakal
Yashasvi Jaiswal stunning catch to dismiss Lahiru Udara: भारतीय संघाने दुसऱ्या कसोटीतही विजयाच्या दिशेने पाया मजबूत केला आहे. पहिल्या डाव ९ बाद ५०३ धावांवर घोषित केल्यानंतर श्रीलंकेच्या दोन फलंदाजांना अवघ्या ८ धावांवर माघारी पाठवून भारताने सामन्यावर पकड घेण्यास सुरूवात केली आहे. या सामन्यात यशस्वी जैस्वाल जास्त चर्चेत राहिला.. पहिल्या डावात श्रीलंकन गोलंदाजासोबत केलेल्या भांडणामुळे त्याच्यावर ICC ने दंडात्मक कारवाई केली. त्यात काल त्याच्या एका भन्नाट कॅचने सोशल मीडियावर हवा केली आहे.