rat15p23.jpg-
4561
रत्नागिरी ः तालुक्यातील गावडेआंबेरे येथे आयोजित तेली समाजाच्या बैठकीमध्ये मार्गदर्शन करताना पुरुषोत्तम आंब्रे.
तेली समाजातर्फे वाडीवस्तीवर संपर्क अभियान
तालुका तेली समाज संघ ; गावडेआंबेरेमधून सुरवात
सकाळ वृत्तसेवा
पावस, ता. १६ ः तेली समाजाची वस्ती जिथे आहे, त्या ठिकाणी प्रत्यक्ष भेट देऊन समाजातील लोकांनी संवाद साधण्याचा निर्धार रत्नागिरी तालुका तेली समाज सेवा संघाच्यावतीने करण्यात आला आहे. त्या निमित्ताने गावडेआंबेरे येथील आंब्रेवाडी श्री दत्त मंदिरात बैठक झाली. त्या बैठकीला गावडे आंबेरे, शिवार आंबेरे, भडे, लावगण व आजूबाजूच्या परिसरातील समाज बांधव उपस्थित होते.
दत्त मंदिरात झालेल्या बैठकित सामाजिक कार्यकर्ते पुरुषोत्तम आंब्रे यांनी प्रास्ताविक केले व माजी सरपंच संजीवकुमार राऊत यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन सर्वांचे यथोचित स्वागत केले. तालुकाध्यक्ष सचिन लांजेकर, उपाध्यक्ष निलेश कोतवडेकर, मार्गदर्शक नारायण झगडे, कार्याध्यक्ष दिपक राऊत, जिल्हाध्यक्ष रघुविर शेलार यांनी तालुक्यात राबविण्यात येत असलेले विविध उपक्रम, संघटना मजबूत होऊन सर्वांनी एकत्र येऊन काम करणे कसे गरजेचे आहे याची माहिती दिली. या बैठकीला सेवा आघाडीचे काशिनाथ सकपाळ, तालुका उपाध्यक्ष मंदार कदम, युवक अध्यक्ष मयूर बळगे उपस्थित होते. भविष्यात एकत्र काम करीत एकमेकांना पूर्ण सहकार्य करण्याचे आश्वासन उपस्थित पदाधिकाऱ्यांनी दिले. याप्रसंगी काशिनाथ खानविलकर, सखाराम आंब्रे, पुरुषोत्तम आंब्रे, सौ. अर्मिता आंब्रे इत्यादींनी अतिशय चांगली सकारात्मक चर्चा घडवून आणली. ही बैठक यशस्वी करण्यासाठी तेजस आंब्रे, सदानंद आंब्रे, अनंत खानविलकर, सिध्देश आंब्रे, गोपिनाथ आंब्रे, प्रदिप आंब्रे, संतोष आंब्रे, रमेश खानविलकर, विश्वनाथ खानविलकर, संतोष आडविलकर, अनंत राऊत, संतोष राऊत, प्रकाश आंब्रे, उमेश राऊत, सदानंद राऊत, संजय राऊत, प्रमोद आडविलकर, यश आंब्रे, रोहित आंब्रे, प्रथमेश आंब्रे, सौ. जोत्स्ना आंब्रे, सौ. वैभवी आंब्रे यांनी मेहनत घेतली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.