कोकण

तायक्वांदो स्पर्धेत शुभ्रा गुरवला रौप्य पदक

CD

काही सुखद---------लोगो

- rat१७p९.jpg-
२५O०४८७३
राजापूर ः प्रशिक्षक मुकेश नाचरे यांच्यासह रौप्यपदक विजेती शुभ्रा गुरव आणि आयुष बावकर.
---
तायक्वांदोत शुभ्रा गुरवला रौप्यपदक
राज्यस्तरीय स्पर्धा ; ४५० हून अधिक खेळाडूंचा सहभाग
सकाळ वृत्तसेवा
राजापूर, ता. १७ ः तायक्वांदो असोसिएशन ऑफ महाराष्ट्रच्या मान्यतेने आणि अहिल्यानगर तायक्वांदो असोसिएशनच्या सहकार्याने ८व्या क्युरोगी व ५व्या पुमसे राज्यस्तरीय कॅडेट तायक्वांदो स्पर्धा नुकतीच झाली. यास्पर्धेमध्ये राजापूरची कन्या शुभ्रा गुरव हिने रौप्यपदक पटकावले.
शिर्डी अहिल्यानगर येथे पार पडलेल्या या राज्यस्तरीय स्पर्धेमध्ये राज्यभरातील सुमारे ४५० खेळाडू सहभागी झाले होते. या स्पर्धेमध्ये तालुक्यातील तायक्वांदो अ‍ॅकॅडमी राजापूर व नॅशनल इंग्लिश स्कूल व ए. इ. काळसेकर कॉलेज रानतळे या प्रशालेतील खेळाडू शुभ्रा गुरव ही सहभागी झाली होती. २९ किलोखालील वजनीगटांमध्ये तिने रत्नागिरी जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करताना उत्कृष्ट खेळाच्या जोरावर रौप्यपदकाची कमाई केली. राजापूर प्रशालेचा खेळाडू आयुष बावकरने ६१ किलोखालील वजनीगटात रत्नागिरी जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करत स्पर्धेमध्ये सहभाग घेतला होता तर, श्रुतिका मांडवकरने राज्यस्पर्धेत पंच म्हणून कामगिरी बजावली. हे दोन्ही यशस्वी खेळाडू धर्मशाळा मारुती मंदिर राजापूर येथील मुख्य प्रशिक्षण केंद्रात तायक्वांदो खेळाचे धडे गिरवत आहेत. त्यांना राजापूर तालुकाप्रमुख प्रशिक्षक मुकेश नाचरे, मधुरा नाचरे, श्रुतिका मांडवकर, अंश गुंड्ये, गौरव धालवलकर हे मार्गदर्शन करत आहेत. यशस्वी खेळाडूंचे राजापूरवासीयांनी कौतुक केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

School Trip Rules: शिक्षकांसह विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी! शैक्षणिक सहलीसाठी नवे नियम लागू

CNG Supply: मुंबईतील सीएनजी पुरवठा कधी सुरळीत होणार? एमजीएलने तारीख अन् वेळच सांगितली, वाहनचालकांना मोठा दिलासा

Numerology Predictions : 'या' तारखेला जन्मलेले लोक असतात जास्त निरोगी..वयाची साठी पार केली तर जडत नाहीत आजार

Latest Marathi Breaking News: इचलकरंजी महापालिकेच्या आरक्षणात सहा प्रभागात फेरबदल

Pune News : पुणे महापालिकेत कनिष्ठ अभियंतापदासाठी एक डिसेंबरला परिक्षा

SCROLL FOR NEXT