कोकण

बर्वे ग्रंथालयात पुस्तक प्रदर्शन

CD

05695

बर्वे ग्रंथालयात
पुस्तक प्रदर्शन
सकाळ वृत्तसेवा
देवगड, ता. २० : येथील उमाबाई बर्वे ग्रंथालयामध्ये भगवान बिरसा मुंडा यांचा जन्मदिन साजरा करण्यात आला. यानिमित्त भाजप प्रदेश उपाध्यक्ष माधव भांडारी यांनी ग्रंथालयाला भेट दिलेल्या पुस्तकांचे प्रदर्शन भरवण्यात आले होते.
श्री. भांडारी यांनी स्वातंत्र्यसेनानी भगवान बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण केला. यानिमित्त श्री. भांडारी यांनी देणगी दिलेल्या ग्रंथांचे प्रदर्शन भरवण्यात आले होते. यावेळी त्यांनी जल, जमीन आणि जंगलाच्या संवर्धनासाठी झटणारे, जननायक, भगवान बिरसा मुंडा यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन करून सर्व जनजातीय गौरव दिनाच्या शुभेच्छा दिल्या. ग्रंथालयाच्या सांस्कृतिक आणि वाचक चळवळ वृद्धिंगत करण्यासाठी बर्वे ग्रंथालय राबवत असलेल्या उपक्रमाबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले. ग्रंथालयाचे अध्यक्ष गुरुदेव परूळेकर यांनी त्यांचे स्वागत केले. यावेळी श्री. भांडारी यांनी ग्रंथालयासाठी १२० पुस्तके देणगी म्हणून दिली. यामध्ये मराठ्यांचा इतिहास, भारताचे संविधान, संत साहित्य, शेती, राजकारण, चरित्रे तसेच वैचारिक आदी विषयांवरील ग्रंथांचा समावेश आहे. ग्रंथालयाचे सचिव सीताराम पाटील यांनी त्यांचे आभार मानले. यावेळी चिन्मय भांडारी, सुनील मेस्त्री, धोंडू कोयंडे तसेच ग्रंथालयाचे वाचक उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jitendra Awhad: छत्रपती शिवाजी महाराजांबाबत आव्हाडांचे वादग्रस्त विधान; विधानसभेत गदारोळ

घरकूल लाभार्थीकडून 12,000 लाच घेणारा ग्रामसेवक व शिपाई पकडला! 20 हजाराची मागणी, 15 हजार द्यायचे ठरले अन्‌ 12 हजार घेतले, वाचा...

Pune Crime: पुण्यात अपघाताच्या बहाण्याने वाहनचालकांना लुटणारे मेरठचे दोघेजण गजाआड; गाडी पायावरून गेल्याचा बनाव अन्..

बापाचाच लेकीवर अत्याचार! अल्पवयीन मुलगी गर्भवती, आजारी असल्याने माढ्यातील दवाखान्यात गेली, डॉक्टरांनी तपासणी केली अन्‌...

Pune News: पुणे महापालिकेने केली तब्बल ८०० कोटीची करमाफी; चार महिन्यात १ हजार ७० कोटीची वसूली, काय आहे अभय योजना?

SCROLL FOR NEXT