rat21p1.jpg-
05784
रत्नागिरी : सॅक्रेड हार्ट कॉन्व्हेंट हायस्कूलतर्फे मतदार जनजागृतीसाठी प्रभातफेरी काढताना विद्यार्थी.
सॅक्रेड हार्ट स्कूलतर्फे
मतदार जनजागृती
रत्नागिरी, ता. २२ : सॅक्रेड हार्ट कॉन्व्हेंट स्कूलमार्फत (शहर) नगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहरामध्ये मतदार जनजागृती कार्यक्रमांतर्गत प्रभातफेरीचे आयोजन केले होते.
आगामी निवडणुकीच्या माध्यमातून सर्व मतदारांना मतदान करण्यासाठी प्रवृत्त करणे तसेच मतदान आपला हक्क बजावणे या संदर्भात जनजागृती करण्यासाठी ही प्रभातफेरी काढण्यात आली. शाळेतील आठवीचे विद्यार्थी व शिक्षक यांच्यासमवेत प्रभातफेरीला सुरवात झाली. गाडीतळ, पोस्टऑफिस, रामआळी, मच्छीमार्केटमार्गे फेरी पुन्हा शाळेत आली. या वेळी विद्यार्थ्यांनी मतदानासंदर्भात विविध घोषणा देऊन सर्वांचे लक्ष वेधून घेतले. विद्यार्थी मतदानाबद्दल माहिती देत आहेत, हे समजल्यानंतर लोकंही थांबून घोषणा ऐकत होते. मुलांनाही याबद्दल माहिती मिळाली तसेच त्यांनीही मतदान प्रक्रिया व मतदान प्रक्रियेतील मतदान करण्याचा अधिकार याची माहिती समजून घेतली. फेरी यशस्वी करण्यासाठी शाळेच्या मुख्याध्यापिका सिस्टर जॉयलेट यांचे मार्गदर्शन लाभले.