वायंगणी सुरंगणपाणी येथे
आजपासून विविध कार्यक्रम
सकाळ वृत्तसेवा
वेंगुर्ले, ता. २६ ः वायंगणी-सुरंगपाणी येथील श्री देव विठ्ठल पंचायतनातील दत्तमंदिरात गुरुवारपासून (ता. २७) दत्तनवकारंभ ते ५ डिसेंबर दत्तजन्ममहोत्सव होणार आहे. यानिमित्त धार्मिक कार्यक्रमांसह भजन, नामस्मरण व दशावतारी नाट्यप्रयोग आयोजित केले आहेत.
यामध्ये २७ नोव्हेंबर ते ५ डिसेंबर कालावधीत रोज सकाळी आठला श्रींची पाद्यपूजा, सकाळी दहाला नामस्मरण, दुपारी आरती, तीर्थप्रसाद, नैवेद्य, सायंकाळी सातला निमंत्रित भजने, २७ नोव्हेंबरला श्री विठ्ठल रखुमाई वारकरी मजनमंडळ, म्हापण पंचक्रोशी यांचे भजन, २८ ला श्री देव पुरुषोत्तम प्रासादिक जनमंडळ, तेंडोली यांचे भजन, २९ ला श्री रामेश्वर महिला बारकरी भजन मंडळाचे भजन, ३० ला श्री भावईदेवी वारकरी भजनमंडळ, कोचरा यांचे भजन, १ डिसेंबरला स्वरबंदिश प्रासादिक भजन मंडळ, वेंगुर्ले यांचे भजन, २ ला आंदुलाई प्रासादिक भजन मंडळ, आंदुर्ले यांचे भजन, ३ डिसेंबरला सायंकाळी सातला श्री सावरेश्वर दशावतार नाट्यमंडळ आवेरा यांचे ‘कानडा विठ्ठल कर्नाटकू’ हे नाटक, ४ ला सकाळी आठला श्रींची पाद्यपूजा, ११ वाजता बुवा रुपेंद्र परब आणि शिष्यसमुदाय यांचा ‘स्वररजनी’ कार्यक्रम, दुपारी आरती, नैवेद्य, सायंकाळी सहाला दत्तजन्मसमयी पुष्पवृष्टी पालखी प्रदक्षिणा भिक्षादान, आरती, सायंकाळी साडेसातला पावणादेवी समई नृत्य किंजवडे-देवगड यांचे ‘समई नृत्य’, ५ डिसेंबरला सकाळी श्रींची पाद्यपूजा, महाप्रसाद, सायंकाळी सातला गावडेवंश तरुणहौशी नाट्यमंडळ हरमल-गोवा यांचा दोन अंकी नाट्यप्रयोग ‘कथा कुणाची व्यथा कुणाला’ होईल. लाभ घ्यावा, असे आवाहन देवस्थानचे व्यवस्थापक दादा पंडित यांनी केले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.