भरणे समर्थनगरात घरफोडी
खेड ः तालुक्यातील भरणे समर्थनगर परिसरात पहाटेच्या सुमारास चोरट्याने घरफोडी केली. या घरफोडीत भाड्याच्या खोलीत राहणाऱ्या साक्षी सचिन जाधव यांची १० हजारांची रोख रक्कम चोरीला गेली आहे. ही घटना २६ ला पहाटेच्या दरम्यान घडली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चोरट्याने फिर्यादी राहत असलेल्या दिवेकर चाळ येथील खोलीच्या दर्शनी स्लायडिंग खिडकीजवळील सेफ्टी लोखंडी ग्रीलच्या उजव्या बाजूकडील खिळे हत्याराने उचकटून काढले. त्यानंतर खिडकीतून आत प्रवेश करत चोरट्याने घरातील लोखंडी कपाट उघडून त्यात ठेवलेल्या पर्समधील १० हजारांची रोख रक्कम चोरून नेली. यानंतर चोरट्याने खोलीचे आतून बंद असलेली दर्शनी दरवाजाची कडी उघडून पळ काढल्याचे फिर्यादीने खेड पोलिस ठाण्यात दिलेल्या तक्रारीत नमूद केले आहे. पुढील तपास खेड पोलिस करत आहेत.
--
काडवली येथील
स्टोन क्रशरवर चोरी
खेड ः तालुक्यातील काडवली येथे स्टोन क्रशरवर काम करणाऱ्या कर्मचाऱ्याने तब्बल दोन लाख ८६ हजार रुपये किमतीचा ऐवज चोरून नेल्याची घटना उघडकीस आली आहे. ही चोरी १८ नोव्हेंबर सकाळी घडली असून, तक्रार मात्र २६ नोव्हेंबर २०२५ रोजी दाखल करण्यात आली. फिर्यादी प्रथमराव रवींद्र पालांडे-देशमुख (वय ३२, रा. धामणंद, बसस्टॉपजवळ) यांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यांच्या मालकीच्या स्टोन क्रशरवर काम करणारा शाहरूख (पूर्ण नाव व पत्ता अज्ञात) या कामगाराने क्रशरवरील विविध साहित्य चोरी करून तो पसार झाला आहे. चोरीला गेलेल्या मुद्देमालामध्ये चार हजार रुपये किमतीचे दोन चॉकलेटी रंगाचे सिलिंग फॅन, तीन हजार रुपये किमतीच्या २ पांढऱ्या रंगाच्या एमसीबी लाईट (प्रत्येकी १५००) तसेच ३२ हजार रुपये किंमतीच्या १६ इलेक्ट्रिक वायर बंडल (प्रत्येकी २ हजार रुपये), पाच हजार रुपये किमतीची पिवळ्या रंगाची ग्राइंडर मशिन, १२ हजार रुपये किंमतीचे २ पिवळ्या रंगाचे स्पॅनर बॉक्स सेट (प्रत्येकी ६ हजार रुपये) ८० हजार रुपये किंमतीची क्रशर मशिनच्या कन्वेयर बेल्टची १६ बेअरिंग (प्रत्येकी ५ हजार रुपये) १ लाख ५० हजार किमतीचा पोकलेन मशिनच्या इंजिन पार्टमधील हायड्रॉलिक पंप असा ऐवज चोरीस गेला आहे. या प्रकरणी शाहरूखवर गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास खेड पोलिस करत आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.