कोकण

-राऊत यांच्या दौऱ्यानंतरही चिपळूणातील सेनेत दुफळी

CD

ठाकरे शिवसेनेतील दुफळी कायम
शिवसैनिक संभ्रमात ; भास्कर जाधव रमेश कदमांबरोबरच
सकाळ वृत्तसेवा
चिपळूण, ता. २८ : चिपळूण पालिकेतील सावळागोंधळ सुरूच असून, ठाकरे शिवसेनेतील नेत्यांमधील दिलजमाई अद्यापही झालेली नाही. माजी खासदार विनायक राऊत यांच्या चिपळूण दौऱ्यानंतर आमदार भास्कर जाधव यांची नाराजी दूर होईल, अशी अपेक्षा केली जात होती; मात्र त्यावर तोडगा निघालेला नाही. निवडणूक प्रचार अंतिम टप्यात आला असला तरीही आमदार जाधव हे आपल्या निर्णयावर ठाम असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. नेत्यांच्या वादात शिवसैनिकाची संभ्रमावस्था कायम आहे.
काही दिवसापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे उमेदवार रमेश कदम आणि आमदार भास्कर जाधव यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेऊन रमेश कदम आघाडीचे उमेदवार आहेत आणि मी त्यांचा प्रचार करणार असल्याचे त्यांनी सांगितले होते. दुसरीकडे ठाकरे गटातील २१ उमेदवारांनी माजी खासदार विनायक राऊत यांच्या सांगण्यावरून अर्ज भरले. त्यामुळे भास्कर जाधव विरुद्ध विनायक राऊत हा नेतृत्वाचा वाद पुन्हा एकदा समोर आला. सोमवारी विनायक राऊत चिपळूणमध्ये आल्यानंतर हा वाद मिटवतील, असे सर्वांना वाटले होते. प्रत्यक्षात राऊत यांनी भास्कर जाधव यांची भेट न घेताच ते कार्यकर्त्यांच्या भेटीसाठी गोवळकोटला गेले. तेथे २१ उमेदवारांपैकी १५ जणांनी राऊत यांच्या कार्यकर्ता मेळाव्यास हजेरी लावली तर ६ उमेदवारांनी दांडी मारल्याने गटातटाच्या राजकारणाला खतपाणी मिळाले.

कोट
नगराध्यक्षपदाचा उमेदवार देण्यापूर्वी पक्षाचे नेते भास्कर जाधव यांच्याकडे बैठक झाली. नगराध्यक्षपदाच्या उमेदवाराने त्यांची भेट घेतली होती. त्यांचे आशीर्वादही घेतले आहेत. तरीही गैरसमज, समन्वयाचा अभाव असेल तर राजू देवळेकर व नगरसेवकपदाचे उमेदवार भास्कर जाधव यांची भेट घेतील.
- विनायक राऊत, माजी खासदार
---
कोट
मी मुंबईत नाही गावात राहतो. त्यामुळे कोकणातील शिवसैनिक माझ्याकडे मदत मागण्यासाठी येतात. याच पार्श्वभूमीवर मी चिपळूणमध्ये काही निर्णय घेतले. ते चुकीचे असतील तर यापुढे निर्णय घेण्याची वेळ आली आहे.
- भास्कर जाधव, आमदार शिवसेना

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jitendra Awhad: छत्रपती शिवाजी महाराजांबाबत आव्हाडांचे वादग्रस्त विधान; विधानसभेत गदारोळ

घरकूल लाभार्थीकडून 12,000 लाच घेणारा ग्रामसेवक व शिपाई पकडला! 20 हजाराची मागणी, 15 हजार द्यायचे ठरले अन्‌ 12 हजार घेतले, वाचा...

Pune Crime: पुण्यात अपघाताच्या बहाण्याने वाहनचालकांना लुटणारे मेरठचे दोघेजण गजाआड; गाडी पायावरून गेल्याचा बनाव अन्..

बापाचाच लेकीवर अत्याचार! अल्पवयीन मुलगी गर्भवती, आजारी असल्याने माढ्यातील दवाखान्यात गेली, डॉक्टरांनी तपासणी केली अन्‌...

Pune News: पुणे महापालिकेने केली तब्बल ८०० कोटीची करमाफी; चार महिन्यात १ हजार ७० कोटीची वसूली, काय आहे अभय योजना?

SCROLL FOR NEXT