07643
नियंत्रण सुटल्याने
मेढेत डंपर उलटला
सकाळ वृत्तसेवा
दोडामार्ग, ता. ३० : मेढे येथे खडी वाहतूक करणारा डंपर पलटी झाला. ही घटना आज दुपारी १ वाजण्याच्या सुमारास घडली. यात चालक जखमी झाला असून, डंपरचे मोठे नुकसान झाले आहे. मेढे येथे रस्ता दुरुस्तीचे काम सुरू आहे. यासाठी एक डंपर खडी घेऊन येत होता. चालकाचे डंपरवरील नियंत्रण सुटल्याने डंपर रस्त्यावर पलटी झाला. यात चालकाच्या हाताला दुखापत झाली. डंपरमधील खडी रस्त्यावर पसरल्याने वाहतूक विस्कळीत झाली. घटनेची माहिती मिळताच ग्रामस्थांनी धाव घेतली. त्यानंतर जेसीबीला पाचारण करून रस्त्यावरील खडी बाजूला करण्यात आली. अपघातात डंपरचे मोठे नुकसान झाले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.