कोकण

हत्तींचा उपद्रव २३ वर्षांपासूनचा; ‘ओंकार’ नकोच!

CD

07780

हत्तींचा उपद्रव २३ वर्षांपासूनचा; आता ‘ओंकार’ नकोच!

तळकटवासीयांची भूमिका; फळबागायती श्वास, ‘वनतारा’त पाठवा

सकाळ वृत्तसेवा
दोडामार्ग, ता. १ ः ‘तालुक्यात गेल्या २३ वर्षांपासून हत्तींचा उपद्रव असून येथे त्यांनी शेतीचे, फळबागायतींचे प्रचंड नुकसान केले आहे. नारळ-सुपारीसारख्या कष्टाने वाढविलेल्या बागायती उद्ध्वस्त करत आहेत. तळकट पंचक्रोशीत तर या हत्तींच्या धुमाकुळाने शेतकरी अक्षरशः हैराण झाले आहेत. त्यामुळे तळकटच्या वनक्षेत्रात हत्ती ठेवण्यास आमचा तीव्र विरोध आहे,’ असे तळकट सरपंच सुरेंद्र सावंत यांनी ग्रामस्थांतर्फे आज स्पष्ट केले.

ओंकार हत्तीला ‘वनतारा’त नेऊ नये, या मागणीसाठी बांद्यात प्राणिप्रेमींचे उपोषण सुरू आहे. त्यांनी या हत्तीला तळकट वनक्षेत्रात सोडावे, अशी मागणी केली आहे. या पार्श्वभूमीवर तळकट सरपंच सावंत यांनी ग्रामस्थांच्यावतीने कडाडून विरोध केला आहे. त्यांनी दिलेल्या प्रसिद्धिपत्रकात म्हटले आहे की, काही महिन्यांपूर्वी मोर्ले गावातील एका शेतकऱ्याचा ओंकार हत्तीच्या हल्ल्यात मृत्यू झाल्याने परिस्थितीची गंभीरता पुन्हा अधोरेखित झाली होती. याच हत्तीने आता सावंतवाडी तालुक्यातील बांदा परिसरात उच्छाद मांडला आहे. काल तो हत्ती गोव्याच्या सीमेत गेला असला तरी तो परत येण्याची शक्यता आहे. सध्या त्याला ‘वनतारा’त पाठविण्याची प्रक्रिया सुरू आहे. मात्र, ओंकार हत्तीला ‘वनतारा’त नेऊ नये, या मागणीसाठी बांद्यात प्राणिप्रेमींचे उपोषण सुरू आहे. त्यांनी त्याला तळकटमधील राखीव वनक्षेत्रात सोडावे, अशी मागणी लावून धरली आहे. तळकट पंचक्रोशीत हत्तींच्या धुमाकुळामुळे शेतकरी आधीच अक्षरशः हैराण झाले आहेत. त्यामुळे तळकटच्या वनक्षेत्रात हत्ती ठेवण्यास तीव्र विरोध आहे.
---
आमच्याही पिढ्यांचा विचार करा!
आम्ही हत्तीबाधित गावातील शेतकरी म्हणून या मागणीला विरोध करतो. कारण बांदा परिसरातील लोकांना हा हत्ती एक महिनाही झेपत नाही, तर आम्ही २३ वर्षांपासून कोणत्या अपराधाची शिक्षा भोगतोय? आम्हीच का या हत्तीचे पोसणे सहन करावे? फळबागायती हा आमचा श्वास आहे. या बागांवरच आमच्या शेकडो कुटुंबांचा उदरनिर्वाह चालतो. आम्ही मुलांसारखे जपून वाढविलेल्या नारळ-सुपारीची झाडे हे हत्ती काही क्षणांत उद्‍ध्वस्त करतात. आमच्या कष्टाचा, आमच्या जीवनाचा, आमच्या भावी पिढ्यांच्या सुरक्षिततेचा विचार तरी कोण करणार?
--
शेतकरी देशोधडीला लावण्याचा कट
काही मंडळी जाणीवपूर्वक हा हत्ती तळकट पंचक्रोशीत परत आणण्याचा आग्रह धरीत आहेत आणि त्यामुळे शेतकऱ्यांना देशोधडीला लावण्याचा कट रचला जात आहे. बागायती संपल्या की, इथला शेतकरी संपणार, हे अशा लोकांना समजणारच कसे? वनविभागाने आम्हा शेतकऱ्यांचे म्हणणे ऐकून घेत हत्तीला तातडीने ‘वनतारा’त हलवावे. शेतकऱ्यांचे प्राण आणि कष्ट वाचवायचे असतील तर वनविभागाने तातडीने कठोर निर्णय घ्यावा. हत्तीला दांड्याच्या सहाय्याने मारहाण झाली, हे आम्हालाही खटकले. मात्र, हत्ती आमच्या भागात सोडण्याची वक्तव्ये करणे हेही आम्हाला आवडले नाही.
----------------
‘तेवढी जागा पडणार अपुरी’
‘तळकट वनक्षेत्राची जागा ४६ हेक्टर आहे. हत्ती त्या ठिकाणी ठेवल्यास तेवढी जागा हत्तीसाठी अपुरी पडणार आहे. हत्तीला पाहिजे असलेल्या सुविधा त्या ठिकाणी नाहीत. याचाही, आंदोलकांनी विचार करावा व त्यानंतरच अशी वक्तव्ये करावीत,’ असेही तळकट सरपंचांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jitendra Awhad: छत्रपती शिवाजी महाराजांबाबत आव्हाडांचे वादग्रस्त विधान; विधानसभेत गदारोळ

घरकूल लाभार्थीकडून 12,000 लाच घेणारा ग्रामसेवक व शिपाई पकडला! 20 हजाराची मागणी, 15 हजार द्यायचे ठरले अन्‌ 12 हजार घेतले, वाचा...

Pune Crime: पुण्यात अपघाताच्या बहाण्याने वाहनचालकांना लुटणारे मेरठचे दोघेजण गजाआड; गाडी पायावरून गेल्याचा बनाव अन्..

बापाचाच लेकीवर अत्याचार! अल्पवयीन मुलगी गर्भवती, आजारी असल्याने माढ्यातील दवाखान्यात गेली, डॉक्टरांनी तपासणी केली अन्‌...

Pune News: पुणे महापालिकेने केली तब्बल ८०० कोटीची करमाफी; चार महिन्यात १ हजार ७० कोटीची वसूली, काय आहे अभय योजना?

SCROLL FOR NEXT