कोकण

कणकवलीत मतदान यंत्रे रवाना

CD

07751

कणकवलीत मतदान यंत्रे रवाना

१७ प्रभाग; ११० कर्मचाऱ्यांसह १६२ पोलिस अधिकारी, कर्मचारी

सकाळ वृत्तसेवा
कणकवली, ता. १ : येथील नगरपंचायतीसाठी थेट नगराध्यक्ष आणि १७ प्रभागांसाठी शहरातील तीन शाळा आणि विद्यामंदिर हायस्कूलमध्ये एकूण १७ मतदान केंद्रे तयार केली आहेत. त्‍यासाठी ११० निवडणूक कर्मचारी तर १६२ पोलिस अधिकारी आणि कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत. आज सकाळी ११ वाजता शहरातील सर्व मतदान केंद्रांवर मतदान यंत्रे रवाना करण्यात आली.
आज सकाळी तहसीलदार कार्यालयात प्रत्‍येक मतदान केंद्रासाठी एक मतदान केंद्राध्यक्ष, तीन सहाय्यक मतदान कर्मचारी आणि एक पोलिस कर्मचारी यांचे पथक तयार करण्यात आले. या पथकाला मतदान केंद्र निश्‍चित करण्यात आले. त्‍यानंतर केंद्रनिहाय ही पथके मतदान केंद्रांवर रवाना करण्यात आली. तहसीलदार तथा निवडणूक निर्णय अधिकारी दीक्षांत देशपांडे, सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी गौरी पाटील, उपविभागीय पोलिस अधिकारी घनश्‍याम आढाव, पोलिस निरीक्षक तेजस नलवडे यावेळी उपस्थित होते. दरम्‍यान, कणकवली शहरात निवडणूक चोख पार पडावी, यासाठी दोन पोलिस तुकड्याही तैनात केल्या आहेत. आठ पोलिस अधिकारी, हवालदार, पोलिस नाईक आणि कॉन्स्टेबल असे ८६ कर्मचारी आणि ६८ होमगार्डही परिसरात तैनात असल्याची माहिती पोलिस निरीक्षक तेजस नलवडे यांनी दिली.
......................
दोन सखी मतदान केंद्रे
कणकवली नगरपंचायतीसाठी दोन सखी मतदान केंद्रे तयार केली आहेत. शहरातील शाळा क्र. २ मधील प्रभाग २ हे मतदान केंद्र तसेच विद्यामंदिर हायस्कूलमधील प्रभाग ६ हे मतदान केंद्र सखी मतदान केंद्र असणार आहे. या मतदान केंद्रातील सर्व कर्मचारी महिलावर्ग असेल, अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी श्री. देशपांडे यांनी दिली.
.....................
प्रभागनिहाय मतदान केंद्रे अशी...
प्रभाग १ ः शाळा क्र. २ पूर्व भाग इमारत इयत्ता तिसरीचा वर्ग
प्रभाग २ ः शाळा क्र. २ ः उत्तर भाग इमारत क्र. २ मधील पाचवीचा वर्ग
प्रभाग ३ ः शाळा क्र. २ उत्तर भाग इमारत क्र. २ सातवीचा वर्ग
प्रभाग ४ ः विद्यामंदिर हायस्कूल पाचवीचा वर्ग (इंग्रजी माध्यम)
प्रभाग ५ ः विद्यामंदिर हायस्कूल पाचवीचा वर्ग
प्रभाग ६ ः विद्यामंदिर हायस्कूल इयत्ता पाचवी (इंग्रजी माध्यम)
प्रभाग ७ ः शाळा क्र. ३ सातवीची वर्ग खोली
प्रभाग ८ ः शाळा क्र. ३ तिसरीची वर्गखोली
प्रभाग ९ ः शाळा क्र. ३ मधील पहिलीचा वर्ग
प्रभाग १० ः शाळा क्र. १ मधील सहावीची वर्गखोली
प्रभाग ११ ः शाळा क्र. १ सातवीची वर्गखोली
प्रभाग १२ ः विद्यामंदिर हायस्कूल आठवीची वर्गखोली
प्रभाग १३ ः विद्यामंदिर हायस्कूल सातवीची वर्गखोली
प्रभाग १४ ः विद्यामंदिर हायस्कूल पाचवीची वर्गखोली
प्रभाग १५ ः शाळा क्र. ५ मधील अंगणवाडी इमारत
प्रभाग १६ ः विद्यामंदिर हायस्कूल सहावीची वर्गखोली
प्रभाग १७ ः शाळा क्र. ५ मधील दुसरीची वर्गखोली

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ajit Pawar Death : शरद पवार बारामतीत दाखल, हेलिकॉप्टरमधून उतरताच दुर्घटनेची माहिती घेतली

Ajit Pawar Plane Crash: बारामती विमान अपघातात निधन झालेली कॅप्टन शांभवी पाठक कोण?

Ajit Pawar Death News LIVE Updates: सुप्रिया सुळे आणि सुनेत्रा पवार बारामतीत दाखल, भावनिक वातावरण

Ajit Pawar Plane Crash : अपघातग्रस्त विमान चालवणारे पायलट नेमके कोण होते? १५ वर्ष विमान चालवण्याचा होता अनुभव

Ajit Pawar: 'पिंपरी-चिंचवड ते बारामती, विकासाची ठसठशीत छाप'; राज ठाकरेंनी आठवला अजित पवारांचा प्रवास, भावनिक पोस्ट करत म्हणाले...

SCROLL FOR NEXT