कोकण

''रोजगार निर्मिती गतिमानता'' पंधरवड्याचे जिल्ह्यात आयोजन

CD

‘रोजगार निर्मिती गतिमानता
पंधरवड्या’चे जिल्ह्यात आयोजन
सकाळ वृत्तसेवा

सिंधुदुर्गनगरी, ता. २ ः उद्योगमंत्री तसेच विकास आयुक्‍त (उद्योग), उद्योग संचालनालय, मुंबई यांच्या आदेशानुसार ३ ते १७ डिसेंबर या कालावधीत ‘मुख्‍यमंत्री रोजगार निर्मिती योजना गतिमानता पंधरवडा’ जिल्ह्यात राबविण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक श्रीपाद दामले यांनी दिली.
जिल्ह्यात या पंधरा दिवसांमध्‍ये जिल्‍हा उद्योग केंद्रामार्फत जिल्ह्यामध्ये मुख्‍यमंत्री रोजगार निर्मिती योजनेची जनजागृती मोहीम हाती घेण्‍यात येणार आहे. जास्‍तीत जास्‍त प्रस्‍ताव गोळा करणे, ऑनलाईन अर्जप्रणालीद्वारे पोर्टलवर माहिती भरणे, देणे, प्रचार करणे आदी गोष्टी करण्‍यात येणार आहेत. या मोहिमेत मुख्‍यमंत्री रोजगार निर्मिती योजनेचे अर्ज हे निःशुल्‍क भरुन दिले जातील. जिल्ह्याच्या प्रत्‍येक तालुक्‍यात बॅनर व ऑडिओच्‍या माध्‍यमातून या योजनेची प्रचार व प्रसिध्‍दी करण्‍यात येणार आहे. या योजनेतून जास्‍तीत जास्‍त लाभार्थ्‍यांचे अर्ज प्रस्‍ताव त्‍यांच्‍या कागदपत्रांसहित स्‍वीकारून त्‍यांची तात्‍काळ छाननी होणार असून, बॅंकेकडे अशी प्रकरणे लवकरात लवकर आणि प्राधान्‍याने मंजूर करून घेण्‍याचा प्रयत्‍न जिल्‍हा उद्योग केंद्र करणार आहे. यामध्‍ये बॅंकेकडून उपयोगीता प्रमाणपत्रे जमा करणे, बॅंकेत रखडलेली मुख्‍यमंत्री रोजगार निर्मिती योजनेची प्रकरणे मार्गी लावणे हा मुख्‍य हेतू आहे. या पंधरवड्यामध्ये अभियांत्रिकी महाविद्यालय, औद्योगिक प्रशिक्षण संस्‍था, तंत्रनिकेतन महाविद्यालय, पंचायत समिती, ग्रामपंचायत, जिल्‍हा परिषद येथे प्रचार व प्रसार करण्‍यात येणार आहे. संबंधित अधिकारी, उद्योग निरीक्षक हे त्‍या वाहनासोबत हजर राहून उपस्थितांना मार्गदर्शन करतील, त्‍यांचे अर्ज जागेवरच निःशुल्‍क भरून घेतील. तसेच त्‍यांच्‍या शंका व अडचणींचे निराकरण करतील. तरी, लाभार्थ्‍यांनी या जनजागृती मोहिमेचा जास्‍तीत जास्‍त लाभ घ्‍यावा, असे आवाहन जिल्‍हा उद्योग केंद्र महाव्‍यवस्‍थापक यांच्‍याकडून करण्‍यात आले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jitendra Awhad: छत्रपती शिवाजी महाराजांबाबत आव्हाडांचे वादग्रस्त विधान; विधानसभेत गदारोळ

घरकूल लाभार्थीकडून 12,000 लाच घेणारा ग्रामसेवक व शिपाई पकडला! 20 हजाराची मागणी, 15 हजार द्यायचे ठरले अन्‌ 12 हजार घेतले, वाचा...

Pune Crime: पुण्यात अपघाताच्या बहाण्याने वाहनचालकांना लुटणारे मेरठचे दोघेजण गजाआड; गाडी पायावरून गेल्याचा बनाव अन्..

बापाचाच लेकीवर अत्याचार! अल्पवयीन मुलगी गर्भवती, आजारी असल्याने माढ्यातील दवाखान्यात गेली, डॉक्टरांनी तपासणी केली अन्‌...

Pune News: पुणे महापालिकेने केली तब्बल ८०० कोटीची करमाफी; चार महिन्यात १ हजार ७० कोटीची वसूली, काय आहे अभय योजना?

SCROLL FOR NEXT