कोकण

बांद्यात दारु वाहतूक रोखली

CD

swt2424.jpg
13219
इन्सुली : येथे पकडण्यात आलेल्या मुद्देमाल व संशयित यांच्यासह राज्य उत्पादन शुल्क खात्याचे अधिकारी व कर्मचारी.
(छायाचित्र : नीलेश मोरजकर)

बांद्यात दारू वाहतूक रोखली
सोलापुरातील एकजण ताब्यात; दारूसह ११ लाखांचा मुद्देमाल जप्त
सकाळ वृत्तसेवा
बांदा, ता. २४ ः राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या इन्सुली तपासणी नाका पथकाने महामार्गावर बांदा सटमटवाडी येथे सापळा रचून मोठी कारवाई केली. या कारवाईत गोव्यातील अवैध मद्याची वाहतूक करणारा एक टेम्पो पकडला. पोलिसांनी सोलापूर येथील एकाला अटक केली असून​ प्रवीण महावीर बोराडे (वय ३०, रा. सोलापूर) असे त्याचे नाव आहे. या कारवाईत ३ लाख ६८ हजार ६०० रुपयांची दारू आणि ८ लाख रुपये किमतीचे वाहन असा एकूण ११ लाखांहून अधिकचा साठा जप्त केला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, गोवा-मुंबई राष्ट्रीय महामार्गावर बांदा येथील हॉटेल विवा क्लासिक समोर इन्सुली तपासणी नाक्याच्या पथकाने सापळा रचून ही कारवाई केली. गोव्याकडून एक पांढऱ्या रंगाचा टेम्पो (क्रमांक ः एमएच १० डीटी ५३०७) संशयास्पदरित्या येत असल्याची गोपनीय माहिती पथकाला मिळाली होती. त्यानुसार मंगळवारी (ता. २३) रात्री साडेआठच्या सुमारास पोलिसांनी या वाहनाची झडती घेतली. यावेळी वाहनाच्या मागील हौद्यामध्ये चोरकप्पा तयार केला होता. त्यावर सिमेंटच्या विटा रचून त्याखाली गोवा बनावटीच्या विदेशी मद्याचे ३६ खोके लपवून ठेवल्याचे उघड झाले. त्याच्यावर महाराष्ट्र दारूबंदी कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करून कारवाई केली आहे. पथकाने ३ लाख ६८ हजार ६०० रुपये किमतीचे मद्य, ८ लाख रुपये किमतीचा टेम्पो असा मुद्देमाल जप्त केला. ही कारवाई राज्य उत्पादन शुल्क विभागाचे आयुक्त डॉ. राजेश देशमुख आणि अधीक्षक कीर्ती शेडगे यांच्या मार्गदर्शनाखाली दुय्यम निरीक्षक धनंजय साळुंखे, विवेक कदम, रणजित शिंदे, वाहन चालक दीपक वायदंडे, सागर सूर्यवंशी, अभिषेक खत्री, सतीश चौगुले यांच्या पथकाने केली. अधिक तपास दुय्यम निरीक्षक धनंजय साळुंखे करत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

PM kisan 22nd Installment : पंतप्रधान मोदी आज 'पीएम किसान' चा २२ वा हप्ता जारी करणार; तुमच्या खात्यात पैसे येणार की नाही? असं चेक करा

Parbhani Gas Booking Trouble: गॅस सिलिंडर बुकिंग सर्व्हर डाउन, ऑनलाइन नोंदणी ठप्प, परभणी गॅस एजन्सी गर्दी

बोर्डाचे शिक्षकांना आदेश! दहावी-बारावीच्या उत्तरपत्रिका तपासणी शाळेतच बंधनकारक; २१ दिवसांसाठी २१ दिवसांची मुदत, आता उत्तरपत्रिकांचे गठ्ठे इतिहासजमा

Sunetra Pawar: यशवंत विचारांनीच कायम वाटचाल करणार: उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, कऱ्हाडला बाळासाहेब पाटील यांना काय म्हणाल्या?

मोठी बातमी! उजनी धरणातून शेतीसाठी २० मार्चनंतर सुटणार सलग ८० दिवस पाणी; कालवा सल्लागार समितीची पुढील आठवड्यात बैठक, वाचा...

SCROLL FOR NEXT