जपूया बीज वारसा - लोगो
rat29p6.jpg
O14153
इंट्रो
गेल्या वर्षभरात आपण आदिम बियाण्यांवर विविध अंगांनी विचार केला. आपण शेतीचा इतिहास, शेतकऱ्यांचे अनुभव आणि ज्ञान, अन्नसुरक्षा आणि पोषण सुरक्षा मिळवण्यासाठी असलेले जैवविविधतेचे महत्त्व तसेच पर्यावरणीय समतोल या सर्व मुद्द्यांचा केंद्रबिंदू म्हणून आदिम बियाण्यांबद्दल जाणून घेतले. बियाणी ही केवळ शेतीची साधने नसून हजारो वर्षांची मानवी संस्कृती, ज्ञान आणि निसर्गाशी असलेले नाते यांचे प्रतीक आहेत.
- कुणाल अणेराव, वरिष्ठ प्रकल्प अधिकारी, सृष्टीज्ञान संस्था
---------
शेतीमधून आत्मनिर्भरता वाढते !
गेल्या दीडशे वर्षांत यात हळूहळू बदल होत अखेरीस गेल्या पन्नास वर्षांत रासायनिक शेती करत असताना कित्येक आदिम बियाणी नष्ट झाली. आजच्या काळात संकरित आणि जनुकीय बियाण्यांमुळे उत्पादन वाढले असले तरी त्यामागे जैवविविधतेचा ऱ्हास, जमिनीची सुपीकता कमी होणे आणि शेतकऱ्यांचे बाजारावरील वाढते अवलंबित्व हे गंभीर प्रश्न उभे राहिले आहेत. अशा वेळी आदिम बियाणी ही केवळ भूतकाळाची आठवण नसून भविष्याची गरज बनली आहेत, हे ओळखून काम करणारे शेतकरी, संस्था यांची ओळखही आपण या लेखमालेमधून करून घेतली.
आदिम बियाण्यांचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे त्यांची स्थानिक परिस्थितीशी जुळवून घेण्याची क्षमता ! हवामान बदलामुळे होणारे पर्जन्यमानातील बदल, प्रचंड कोसणारा पाऊस ते दुष्काळ, वाढते तापमान आणि त्याबरोबर येणारी रोगराई यांना तोंड देत ही बियाणे टिकून राहतात. त्यामुळे रासायनिक खतांवर आणि महागड्या औषधांवर अवलंबून न राहता शाश्वत शेतीचा मार्ग दाखवण्याचे सामर्थ्य त्यांच्यात आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचा उत्पादनखर्च कमी होऊन आत्मनिर्भरता वाढते. भारतीय अर्थव्यवस्थेचा कणा असलेल्या शेत कसणारा शेतकरी वैफल्यग्रस्त होऊन आत्महत्या करतो आहे आणि मधल्या फळीतील आडते. व्यावसायिक मात्र गब्बर होत आहेत. हे रोखायचे असेल तर सर्वसामान्य ग्राहकांनीदेखील विचारपूर्वक खरेदी करणे आवश्यक आहे. आदिम बियाण्यांचे जतन, संवर्धन आणि पुनरूज्जीवन ही सामूहिक जबाबदारी आहे. शेतकरी, संशोधक, ग्राहक, धोरणकर्ते आणि राजकीय इच्छाशक्ती यांनी एकत्र येऊन या बियाण्यांना पुन्हा शेतीच्या केंद्रस्थानी आणले पाहिजे.
आदिम बियाणी वाचवणे म्हणजे केवळ बियाणी वाचवणे नव्हे, तर आपली माती, आरोग्य, संस्कृती आणि पुढील पिढ्यांचे भविष्य सुरक्षित करणे होय. यापुढे देखील बियाण्यांसंदर्भात काहीही माहिती हवी असल्यास किंवा कोकणातील स्थानिक भातबियाणी हवी असल्यास जरूर संपर्क करावा. लेखमाला संपली असली तरीही आदिम बियाणी संवर्धन ही चळवळ थांबू नये तर अधिक बळकट व्हावी, हीच या लेखमालेच्या समारोपातून अपेक्षा.
(लेखक स्वत: शेतकरी असून, आदिम बियाणी संवर्धन करत आहेत.)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.