14482
अपघातातील जखमी तरुणाचा मृत्यू
आरोंदा, ता. ३० ः अपघातात जखमी झालेल्या वरची मळेवाड (देऊळवाडी) येथील तुकाराम उर्फ आबा चंद्रहास माळकर (वय ४१) या तरुणाचा मृत्यू झाला. काही दिवसांपूर्वी त्याचा अपघात झाला होता. गेले पंधरा दिवस त्याच्यावर बांबोळी-गोवा येथील रुग्णालयात उपचार सुरू होते. अखेर आज त्याची प्राणज्योत अखेर मालवली. त्याच्या मागे आई, पत्नी व विवाहित बहीण असा परिवार आहे.