कोकण

जीडीसीए आणि सीएचएम परीक्षेसाठी रत्नागिरीत केंद्र

CD

‘जीडीसीए’, ‘सीएचएम’साठी रत्नागिरीत केंद्र
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. ८ ः सहकार क्षेत्रात करिअर करू इच्छिणाऱ्या कोकणातील विद्यार्थ्यांसाठी दिलासादायक निर्णय घेण्यात आला आहे. ‘शासकीय सहकार व लेखा पदविका’ (जीडीसी अॅण्ड ए) आणि ‘सहकारी गृहनिर्माण व्यवस्थापन प्रमाणपत्र’ (सीएचएम) या परीक्षांसाठी रत्नागिरी येथे नवीन परीक्षा केंद्र सुरू करण्यात आले आहे. त्यामुळे आता परीक्षार्थींना ठाण्यापर्यंत धाव घेण्याची गरज उरणार नाही.
कोकण विभागात यापूर्वी केवळ ठाणे हे एकच परीक्षा केंद्र उपलब्ध होते. परिणामी, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शेकडो विद्यार्थ्यांना आर्थिक भुर्दंड सोसून ठाण्याला जावे लागत असे. मात्र, मे २०२६ च्या परीक्षेसाठी प्रशासकीय संगणक प्रणालीमध्ये ‘रत्नागिरी’ हे १७ वे नवीन केंद्र म्हणून समाविष्ट करण्यात आले आहे. जिल्हा उपनिबंधक (सहकारी संस्था) डॉ. सोपान शिंदे यांनी दिलेल्या माहितीनुसार, २६, २७ व २८ मे २०२६ रोजी परीक्षा होणार आहे. यासाठी ऑनलाईन अर्ज भरण्याची मुदत ९ जानेवारी ते २३ फेब्रुवारी २०२६ आहे. त्यासाठी https://gdca.maharashtra.gov.in हे अधिकृत संकेतस्थळ आहे. उमेदवारांनी आपले ऑनलाईन अर्ज भरताना परीक्षा केंद्राच्या रकान्यात रत्नागिरी या केंद्राची निवड करावी, असे आवाहन प्रशासनातर्फे करण्यात आले आहे. तसेच अर्जाबाबत काही शंका असल्यास त्यांनी जिल्हा उपनिबंधक, रत्नागिरी या कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

शिक्षकांची नाही यंदा उन्हाळ्याची सुट्टी! एप्रिलअखेर जनगणनेचे प्रशिक्षण अन्‌ १६ मे ते १४ जूनपर्यंत करावी लागणार घरगणना, विशेष रजा मिळणार, वाचा...

Panchang 18 March 2026: आजच्या दिवशी विष्णू सहस्रनाम स्तोत्राचे पठण आणि ‘बुं बुधाय नमः’ या मंत्राचा जप करावा

मोठी बातमी! इराक-इराण युद्धाची सोलापूरकरांना झळ; सोलापूर शहरात रिक्षा चालकांनी वाढविले १० ते १५ रुपये भाडे; कोणत्या मार्गावर किती भाडे? वाचा...

आजचे राशिभविष्य - 18 मार्च 2026

अग्रलेख : धर्मस्वातंत्र्याचे तारतम्य

SCROLL FOR NEXT