कोकण

सावंतवाडीत आज ‘सूर्यनमस्कार संकल्प’

CD

सावंतवाडीत आज
‘सूर्यनमस्कार संकल्प’
सावंतवाडी ः रथसप्तमी आणि जागतिक सूर्यनमस्कार दिनाचे औचित्य साधून फिटनेस योग अकादमी सिंधुदुर्ग आणि घे भरारी फाउंडेशनच्या संयुक्त विद्यमाने उद्या (ता. २५) भव्य १०८ सूर्यनमस्कार संकल्प कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. हा कार्यक्रम येथील ‘आरपीडी’ हायस्कूलच्या सभामंडपात सकाळी सातला होणार आहे. विशेष म्हणजे, नियोजित वेळेत जास्तीत जास्त सूर्यनमस्कार पूर्ण करणाऱ्या सहभागींना आयोजकांकडून रोख स्वरूपात बक्षिसे देऊन गौरविण्यात येणार आहे. यामध्ये प्रथम, द्वितीय, तृतीय आणि दोन उत्तेजनार्थ अशा पाच क्रमांकांसाठी बक्षिसे आहेत. ​जिल्ह्यातील नागरिक आणि योगप्रेमींमध्ये सूर्यनमस्काराची आवड निर्माण व्हावी, या हेतूने आयोजित या कार्यक्रमाच्या शेवटी अल्पोपहाराची व्यवस्था केली आहे. या संकल्प कार्यक्रमात सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जास्तीत जास्त नागरिकांनी आणि योग साधकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन फिटनेस योग शिक्षक शेखर बांदेकर, ‘घे भरारी’च्या अध्यक्षा रेखा कुमठेकर, मोहिनी मडगावकर यांनी केले आहे.
......................
सिंधुदुर्गनगरीत उद्या
शासकीय ध्वजवंदन
सिंधुदुर्गनगरी ः देशाच्या प्रजासत्ताक दिनानिमित्त पालकमंत्री नीतेश राणे यांच्या हस्ते शासकीय ध्वजवंदन सोहळा होणार आहे. हा मुख्य शासकीय सोहळा सोमवारी (ता. २६) सकाळी ९.१५ वाजता येथील पोलिस परेड ग्राऊंडवर होणार आहे. सकाळी ९.३० वाजता पोलिस दल व राखीव पोलिस दलाचे संचलन होणार आहे. जिल्ह्यातील इतर शासकीय कार्यालये व संस्थांनी आपापल्या ठिकाणी ध्वजवंदनाचा कार्यक्रम सकाळी ८.३० वाजता किंवा १० नंतर आयोजित करावा, असे आवाहन जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी केले आहे.
---
खवणे येथे उद्या
आरोग्य चिकित्सा
म्हापण ः माघी गणेश जयंती उत्सवानिमित्त खवणे येथे प्राथमिक आरोग्य केंद्र परुळे व उपकेंद्र म्हापण यांच्या वतीने सोमवारी (ता. २६) सकाळी १० वाजता आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन केले आहे. या शिबिरामध्ये ईसीजी, रक्त तपासणी, रक्तदाब, शुगर तसेच महिलांची तपासणी केली जाणार आहे. या आरोग्य शिबिराचा नागरिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन माघी गणेश जयंती उत्सव मंडळ, खवणे यांच्या वतीने केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jitendra Awhad: छत्रपती शिवाजी महाराजांबाबत आव्हाडांचे वादग्रस्त विधान; विधानसभेत गदारोळ

घरकूल लाभार्थीकडून 12,000 लाच घेणारा ग्रामसेवक व शिपाई पकडला! 20 हजाराची मागणी, 15 हजार द्यायचे ठरले अन्‌ 12 हजार घेतले, वाचा...

Pune Crime: पुण्यात अपघाताच्या बहाण्याने वाहनचालकांना लुटणारे मेरठचे दोघेजण गजाआड; गाडी पायावरून गेल्याचा बनाव अन्..

बापाचाच लेकीवर अत्याचार! अल्पवयीन मुलगी गर्भवती, आजारी असल्याने माढ्यातील दवाखान्यात गेली, डॉक्टरांनी तपासणी केली अन्‌...

Pune News: पुणे महापालिकेने केली तब्बल ८०० कोटीची करमाफी; चार महिन्यात १ हजार ७० कोटीची वसूली, काय आहे अभय योजना?

SCROLL FOR NEXT