कोकण

शिक्षण क्षेत्रात एआयचा प्रभावी वापर गरजेचा

CD

20076

शिक्षण क्षेत्रात ‘एआय’चा प्रभावी वापर करा

शमशुद्दीन अत्तार : गोपुरी आश्रमात मार्गदर्शन

कणकवली, ता. २५ : कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय)चा वापर आज सर्वच क्षेत्रांत वाढत आहे. शिक्षण क्षेत्रही त्याला अपवाद नाही. विद्यार्थ्यांनी आपली ज्ञानकक्षा विस्तारण्यासाठी एआयचा प्रभावी आणि योग्य वापर केला पाहिजे. तसेच शिक्षकांनीही एआयच्या सहाय्याने विद्यार्थ्यांना सर्वांगीण व अद्ययावत ज्ञान देणे आवश्यक आहे. एआयच्या वापरामुळे विद्यार्थ्यांच्या पाठीवरील दप्तराचे ओझेही भविष्यात कमी होईल, असे मत शिरगाव हायस्कूल व ज्यु. कॉलेजचे प्राचार्य तथा एआय तज्ज्ञ शमशुद्दीन अत्तार यांनी व्यक्त केले.
गोपुरी आश्रमच्या जीवन शिक्षण उपक्रमांतर्गत गोपुरी आश्रमातील गणपतराव सावंत सभागृहात ‘एआय आणि अभ्यास व अभ्यासातील एआय’ या विषयावर आयोजित मार्गदर्शनपर कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी गोपुरी आश्रमाचे अध्यक्ष प्रा. राजेंद्र मुंबरकर, संचालिका अर्पिता मुंबरकर, विनायक सापळे, सदाशिव राणे आदी उपस्थित होते. अत्तार यांनी अभ्यास करताना एआयचा नेमका कसा वापर करता येईल, याची सविस्तर माहिती प्रेझेंटेशनद्वारे विद्यार्थ्यांना दिली. एआयचा वापर करून अभ्यास अधिक सोपा, रंजक आणि परिणामकारक कसा करता येईल, यावर त्यांनी मार्गदर्शन केले. कार्यक्रमाच्या शेवटी विद्यार्थ्यांनी एआय संदर्भात विचारलेल्या विविध प्रश्नांना त्यांनी समर्पक व सविस्तर उत्तरे देत त्यांच्या शंका दूर केल्या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मोठी बातमी! पहिली ते नववीची अंतिम सत्र परीक्षा २० एप्रिलपासून; शिक्षक-विद्यार्थ्यांना ४४ दिवसांची उन्हाळा सुट्टी; १५ जूनपासून सुरु होणार शाळा

Weekend Special Recipe: नवीन काहीतरी खायचंय? मग वीकेंडला बनवा चविष्ट मुगदाळीची बाटी, सोपी आहे रेसिपी

Weekly Rashi Bhavishya Horoscope News in Marathi : कसा असेल तुमचा आठवडा..? ग्रहमान : ७ मार्च २०२६ ते १३ मार्च २०२६ - मराठी राशी भविष्य

‘या’ शेतकऱ्यांना नाही कर्जमाफीचा लाभ! ३० सप्टेंबर २०२५ पूर्वीचे थकबाकीदार शेतकऱ्यांनाच दोन लाखांची पीक कर्जमाफी, वाचा...

महाराष्ट्र अर्थसंकल्प २०२६-२७ जाहीर! राज्यात काय स्वस्त झालं, कोणत्या गोष्टी महागल्या? संपूर्ण यादी जाणून घ्या...

SCROLL FOR NEXT