कोकण

करार

CD

-rat24p12.jpg-
26O19817
रत्नागिरी : बारटक्के इन्स्टिट्यूट आणि एसएसके इनोव्हेशन्समध्ये सामंजस्य करार करण्यात आला. त्या वेळी करारपत्र दाखवताना दोन्ही संस्थांचे पदाधिकारी.
----------
कुशल मनुष्यबळ निर्मितीसाठी पुढाकार
बारटक्के, इन्स्टिट्यूट–एसएसके इनोव्हेशन्समध्ये करार
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. २८ : विद्यार्थ्यांना उद्योगाभिमुख शिक्षण मिळावे आणि त्यांच्यातील तांत्रिक कौशल्ये विकसित व्हावीत, या उद्देशाने रत्नागिरी एज्युकेशन सोसायटीचे बारटक्के इन्स्टिट्यूट आणि एसएसके इनोव्हेशन्स प्रा. लि. या इन्फोटेक कंपनीमध्ये सामंजस्य करार करण्यात आला. या करारामुळे भविष्यात कुशल मनुष्यबळ निर्माण होण्यास मोठी मदत होणार आहे. कौशल्य विकासासाठी पुढाकार घेण्यात आला आहे.
या करारामुळे विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष कामाचा अनुभव आणि उद्योगांच्या गरजेनुसार अभ्यासक्रम उपलब्ध होणार आहे. एसएसके इनोव्हेशन्स ही कंपनी रत्नागिरी तसेच पुणे येथून विविध कंपन्यांसाठी काम करत आहे. या भागीदारीमुळे शिक्षण आणि उद्योगक्षेत्रातील अंतर कमी करण्यास मदत होणार आहे. यामध्ये विद्यार्थ्यांना त्यांच्या शैक्षणिक कालावधीत एसएसके इनोव्हेशन्समध्ये प्रत्यक्ष प्रकल्पांवर काम करण्याची संधी मिळेल. या उपक्रमासाठी रत्नागिरी एज्युकेशन सोसायटीचे पदाधिकारी तसेच बारटक्के इन्स्टिट्यूट शालेय समिती अध्यक्षा डॉ. कल्पना मेहता व सर्व समिती सदस्यांनी शुभेच्छा दिल्या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jitendra Awhad: छत्रपती शिवाजी महाराजांबाबत आव्हाडांचे वादग्रस्त विधान; विधानसभेत गदारोळ

घरकूल लाभार्थीकडून 12,000 लाच घेणारा ग्रामसेवक व शिपाई पकडला! 20 हजाराची मागणी, 15 हजार द्यायचे ठरले अन्‌ 12 हजार घेतले, वाचा...

Pune Crime: पुण्यात अपघाताच्या बहाण्याने वाहनचालकांना लुटणारे मेरठचे दोघेजण गजाआड; गाडी पायावरून गेल्याचा बनाव अन्..

बापाचाच लेकीवर अत्याचार! अल्पवयीन मुलगी गर्भवती, आजारी असल्याने माढ्यातील दवाखान्यात गेली, डॉक्टरांनी तपासणी केली अन्‌...

Pune News: पुणे महापालिकेने केली तब्बल ८०० कोटीची करमाफी; चार महिन्यात १ हजार ७० कोटीची वसूली, काय आहे अभय योजना?

SCROLL FOR NEXT