मुंबईत डाक विभागातर्फे
१७ रोजी पेंशन अदालत
सकाळ वृत्तसेवा
सिंधुदुर्गनगरी, ता. ४ ः टपाल विभागातील निवृत्तीवेतनधारक तसेच कुटुंब निवृत्तीवेतनधारकांसाठी मुख्य पोस्टमास्तर जनरल, महाराष्ट्र सर्कल, मुंबई यांच्या वतीने ५८ वी पेंशन अदालत १७ मार्चला सकाळी ११.३० वाजता मुख्य पोस्टमास्तर जनरल, महाराष्ट्र सर्कल, मुंबई (४०० ००१) येथे आयोजित केली असल्याची माहिती सिंधुदुर्ग विभागाचे अधीक्षक डाकघर यांनी दिली आहे.
निवृत्तीवेतनधारकांच्या लाभाशी संबंधित तक्रारी, जे टपाल विभागातून निवृत्त झाले आहेत, ज्यांचा सेवेत असताना मृत्यू झालेला आहे, टपाल विभाग, महाराष्ट्र आणि गोवा राज्यांचे निवृत्तीवेतनधारक ज्यांचे तीन महिन्यांच्या आत पूर्तता झालेली नाही, अशा प्रकरणांचा डाक पेंशन अदालतीमध्ये विचार केला जाईल. पेंशन अदालतमध्ये पूर्णपणे कायदेशीर मुद्द्यांसह प्रकरणे, जसे की वारसा प्रमाणपत्र, वेतनश्रेणी वाढविणे आणि धोरणात्मक बाबीसह शिस्तभंगाच्या आणि डी.पी.सी. च्या पुनरावलोकनासाठी प्रलंबित प्रकरणांचा विचार केला जाणार नाही. पेन्शनधारकांनी आपली तक्रार वैयक्तिकरित्या (एकत्रित स्वरुपात किंवा इतरांच्या वतीने नाही) संलग्न नमुन्यात तीन प्रतींमध्ये वरिष्ठ लेखाधिकारी/सचिव, पेन्शन अदालत, मुख्य पोस्टमास्तर जनरल यांचे कार्यालय, महाराष्ट्र सर्कल, मुंबई जी.पी.ओ. इमारत, पहिला मजला, मुंबई ४०० ००१ येथे पाठवावी किंवा ई-मेलद्वारे १६ फेब्रुवारी किंवा त्यापूर्वी सादर करावी.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.