कोकण

वेदांत आकटे ठरला सर्वोत्कृष्ट विद्यार्थी

CD

rat13p9.jpg-
24264
देवरूख : राजेंद्र माने अभियांत्रिकी महाविद्यालयात वार्षिक स्नेहसंमेलन आरोहणप्रसंगी सर्वोत्कृष्ट विद्यार्थी किताब वेदांत आकटे याला प्रदान करताना प्रबोधन शिक्षणसंस्थेचे अध्यक्ष रवींद्र माने. सोबत कार्यकारी अध्यक्षा नेहा माने, ईशानी माने, प्रद्युम्न माने डॉ. अभिषेक विचारे आदी.
---------
वेदांत आकटे ठरला सर्वोत्कृष्ट विद्यार्थी
माने महाविद्यालय; डॉ. अच्युत राऊतांना बेस्ट रिसर्च पेपर अॅवॉर्ड
रत्नागिरी, ता. १३ : आंबव (ता. संगमेश्वर) येथील राजेंद्र माने अभियांत्रिकी महाविद्यालयाचे २८वे वार्षिक स्नेहसंमेलन आरोहण दिमाखात साजरे झाले. सर्वोत्कृष्ट विद्यार्थी हा किताब कॉम्प्युटर विभागातील वेदांत आकटे याने पटकावला. डॉ. अच्युत राऊत यांना बेस्ट रिसर्च पेपर अॅवॉर्डने सन्मानित करण्यात आले.
या कार्यक्रमाला डॉ. अभिषेक विचारे, डॉ. सुप्रिया गानू-डिचोलकर आणि आयडीएफसी फर्स्ट बँकचे अंबरीश नटे विशेष अतिथी म्हणून उपस्थित होते. प्रबोधन शिक्षणसंस्थेचे संस्थाध्यक्ष रवींद्र माने यांनी स्वागत केले. या वेळी नेहा माने, प्रद्युम्न माने, ईशानी वाघ-माने, प्राचार्य डॉ. महेश भागवत, उपप्राचार्य डॉ. अनिरूद्ध जोशी उपस्थित होते.
डॉ. विचारे यांनी, विद्यार्थ्यांनी कोणत्याही ट्रेंड्सच्या मागे न लागता मुलभूत गोष्टी, कौशल्य विकास व नवनवीन ज्ञान संपादन करण्याची सवय जोपासण्याचा सल्ला दिला. डॉ. गानू-डिचोलकर म्हणाल्या, विद्यार्थ्यांनी हॅकॅथॉन, वर्कशॉपसारख्या उपक्रमामधून सातत्याने सहभागी होण्याची आवश्यकता असून, त्यामुळे शैक्षणिक कालावधी पूर्ण होईपर्यंत ते स्वतः उद्योग व्यवसायासाठी पूर्णतः तयार होऊ शकतात. प्राचार्य डॉ. महेश भागवत यांनी महाविद्यालयाचा वार्षिक अहवाल सादर केला.

चौकट
बक्षीस वितरण
विजेत्यांना करंडक, प्रशस्तीपत्रके व रोख पारितोषिकांचे वितरण करण्यात आले. महाविद्यालयाच्या विभागवार प्रथम येणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्यास (कै.) इंदुमती माने अॅवॉर्ड आणि प्रथम वर्ष अभियांत्रिकीमध्ये प्रथम आलेल्या विद्यार्थ्यास (कै.) राजेंद्र माने अॅवॉर्ड, सर्वोत्कृष्ट विद्यार्थ्याला चेअरमन अॅवॉर्डस् घोषित करण्यात आली. कोइम्बतुर येथे गो-कार्ट डिझाईन चॅलेंज सीझन १३ या स्पर्धेमध्ये सहभागी होण्यासाठी निघालेल्या महाविद्यालयाच्या टीम फुल थ्रोटलने बनवलेल्या गो कार्टचे अनावरण करून शुभेच्छा देण्यात आल्या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Aditya Thackeray targets Mumbai Mayor : बांगलादेशी घुसखोरांवरून आदित्य ठाकरेंचा मुंबईच्या महापौरांना टोला अन् भाजपला सवाल, म्हणाले...

Valentine Day 2026 Marathi Wishes: 'व्हॅलेंटाईन डे' निमित्त तुमच्या प्रेमळ व्यक्तीला पाठवा हृदयस्पर्शी शुभेच्छा, प्रेमाचा दिवस बनेल स्पेशल

Indian Passport Ranking : भारतीय 'पासपोर्ट रँकिंग'मध्ये मोठी सुधारणा!, आता ५६ देशांमध्ये 'Visa-Free' एन्ट्री करता येणार

USA vs NED : अमेरिकेच्या विजयात पुणे, मुंबईचे खेळाडू चमकले; नेदरलँड्सचा पराभव पाकिस्तानच्या पथ्यावर, अ गटाचे चित्र स्पष्ट

अभ्यास करा..! पाचवी अन्‌ आठवीच्या विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती परीक्षा २२ फेब्रुवारीला; परीक्षेत दोन पेपर, १५० गुणांचा वस्तुनिष्ठ प्रश्न, वाचा...

SCROLL FOR NEXT