‘आठल्ये-पित्रे’त
पारितोषिक वितरण
देवरूख ः आठल्ये-सप्रे-पित्रे कनिष्ठ महाविद्यालयाचा वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ उत्साहात झाला. वार्षिक क्रीडा स्पर्धेत यशस्वी कामगिरी करणाऱ्या २५३ विद्यार्थी खेळाडूंना संस्था कार्यवाह शिरीष फाटक, प्राचार्य डॉ. नरेंद्र तेंडोलकर, उपप्राचार्य डॉ. सरदार पाटील, पर्यवेक्षक प्रा. एम. आर. लुंगसे आणि जिमखाना प्रमुख प्रा. धनंजय दळवी यांनी सन्मानित केले. संस्थेने सन्मानित केलेल्या संघामध्ये खो-खो (मुली) व व्हॉलीबॉल (मुले), यशस्वी खेळाडूंमध्ये साईराज आंब्रे (व्हॉलीबॉल व उंच उडी), सुहेल हरचिरकर (व्हॉलिबॉल), प्रिती सनगले व सिद्धी चोरगे (दोघी खो-खो), सार्थक आडशे (गोळाफेक), वेदांत गवंडी (१०० मी. धावणे) यांचा समावेश होता. समारंभात वार्षिक क्रीडा स्पर्धेचे सर्वसाधारण विजेतेपद ११ वी वाणिज्य ''ब'' यांनी पटकावले.
----
कोंडवशीत आजपासून
महाशिवरात्र उत्सव
राजापूर ः तालुक्यातील कोंडवशी (कानडेवाडी) येथील श्रीक्षेत्र स्वयंभू महादेव मंदिरात यंदा महाशिवरात्रीनिमित्त ५० वा सुवर्ण महोत्सव मोठ्या भक्तिभावात साजरा करण्यात येणार आहे. या निमित्ताने विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. शनिवारी (ता.१४) रात्री ८ ते ११ या वेळेत विशेष कीर्तनाचे आयोजन केले आहे. १४ ते १७ या कालावधीत विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहेत. या कालावधीत भाविकांसाठी संपूर्ण दिवसभर दर्शनाची व महाप्रसादाची उत्तम व्यवस्था केली आहे. उत्सवाच्या मुख्य दिवशी रविवारी (ता. १५) पहाटे ४ वा. महाशिवरात्रीनिमित्त महारूद अभिषेक, रूद्राभिषेक व होमहवन, आरती, भोवत्या असे कार्यक्रम होणार आहेत.
----------------
स्वामी समर्थ पादुका
दर्शन धामणीत२२ ला
संगमेश्वर ः संगमेश्वर तालुक्यातील धामणी येथे २२ फेब्रुवारीला सकाळी ८ ते १० या वेळेत श्री स्वामी समर्थ पादुका दर्शन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. प्रभाकर बाबुराव घाणेकर यांच्या निवासस्थानी हा सोहळा होणार आहे. अक्कलकोट येथे प्रत्यक्ष जाऊन दर्शन घेणे सर्व भक्तांना शक्य होत नसल्याने धामणी येथे हा सोहळा आयोजित केला जातो. यावर्षीही मोठ्या उत्साहात पालखीचे आगमन होणार असून, भाविकांनी दर्शनाचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे.
----------------
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.