कोकण

जणू बॉम्ब फुटल्याचा भास होतो अन् थरकाप उडतो

CD

स्फोटांचा आवाज, भीतीची रात्र
अमित साळुंखे ः दुबईत अडकले सहा चिपळूणकर
सकाळ वृत्तसेवा
चिपळूण, ता. ३ः दुबईमध्ये राहणाऱ्या भारतीयांना सतर्क राहण्याचे आणि गर्दीच्या ठिकाणी न जाण्याचे आवाहन येथील सरकारने केले आहे. त्यामुळे आम्ही दरवाजे खिडक्या बंद करून घरामध्ये आहोत. मात्र घराबाहेर मोठ्याने आवाज झाल्यानंतर जणू बॉम्ब फुटल्याचा भास होतो आणि भीतीने थरकाप उडतो. अशी माहिती दुबईमध्ये फिरण्यासाठी गेलेल्या चिपळूणमधील नागरिकांनी ‘सकाळ’शी दूरध्वनीवर बोलताना दिली आहे.
इराण-इस्रायल युद्धामुळे दुबई आणि सौदी अरेबियामध्ये महाराष्ट्रातील हजारो नागरिक अडकले आहेत. चिपळूणमधून सहा जण दुबईमध्ये फिरण्यासाठी गेले होते. तेही अडकले आहेत. चिपळूणमधील अमित साळुंखे आपल्या मित्रांसह दुबईमध्ये अडकले आहेत. ते राहत असलेल्या हॉटेलपासून पंधरा मिनिटांच्या अंतरावर स्फोट झाला. त्यावेळी ते जीवनावश्यक खरेदीसाठी मार्केटमध्ये आले होते. स्फोटाचा आवाज ऐकल्यानंतर ते पुन्हा धावत पळत हॉटेलमध्ये निघून गेले. ते काल (ता.२) माघारी येणार होते. परंतु अमेरिका आणि इस्रायलचा इराणसोबत सुरु असलेल्या युद्धाचा भडका हळूहळू वाढताना पाहायला मिळत आहे. त्यामुळे दुबईमधील त्यांचा मुक्काम वाढला आहे.
त्यांना तीन मार्चला मुंबईसाठी विमानाची व्यवस्था केली जाईल असे सांगण्यात आले होते. परंतु सुरक्षेच्या कारणास्तव तीन मार्चचा मुंबईसाठी विमान उडाले नाही त्यामुळे त्यांना ५ मार्चला विमानाची व्यवस्था केली जाईल असे विमानतळावर सांगण्यात आले आहे.
.......
कोट
‘आम्ही सध्या एका हॉटेलमध्ये सुरक्षित आहोत. पुढील सूचना मिळेपर्यंत हॉटेलमध्येच थांबण्याचे निर्देश स्थानिक प्रशासनाकडून देण्यात आले आहेत. परिस्थितीचा आढावा घेऊन पुढील निर्णय घेऊ,’. कोणीही अफवांवर विश्वास ठेवू नका.
- अल्हाद वरवाडकर, चिपळूण

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Malegaon News : मालेगावच्या दरेगाव शिवारात 'विषाचा' धूर! अवैध प्लास्टिक कारखान्यांमुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात

IPL 2026 Updates: गतविजेत्या RCB चे सामने मुंबईनंतर पुण्यातही नाही होणार! ५ सामने एकीकडे, तर २ दुसरीकडे; जाणून घ्या ब्रेकिंग न्यूज

Gunratna Sadavarte: 'राज ठाकरे रंग बदले, उद्धव संग मंच पे चढले...' गुणरत्न सदावर्ते यांची होळीनिमित्त राजकीय कविता; Video Viral

Video: ७० वर्षांच्या जावयाची गाढवावरुन मिरवणूक; तरुण जावई पळून गेला अन्...

स्मृती मानधना जगात नंबर १! ODI Ranking मध्ये भारतीय बॅटरची झेप, चार वर्षांनी गोलंदाजीतील इक्लेस्टोनचं सिंहासन खालसा

SCROLL FOR NEXT