कोकण

भाजपातर्फे १२ मंडलात उपाध्याय प्रशिक्षण महाअभियान

CD

भाजपतर्फे उपाध्याय प्रशिक्षण महाअभियान
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. १३ : भाजपतर्फे पंडित दीनदयाळ उपाध्याय प्रशिक्षण महाअभियान राबवण्यात येणार आहे. त्याकरिता रत्नागिरी दक्षिण जिल्ह्यातील १२ मंडलांमध्ये निवासी कार्यशाळा होणार आहेत. यासाठी वक्त्यांची नेमणूक केली असून, याचा उपयोग पक्षबांधणीसाठी होणार आहे, असे भाजपचे जिल्हाध्यक्ष प्रशांत यादव यांनी सांगितले.
पंडित दीनदयाळ उपाध्याय महाअभियानाची रत्नागिरी दक्षिण जिल्हा कार्यशाळा चिपळूणच्या बहादूरशेख नाका येथे झाली. त्यांनी या प्रशिक्षणाबाबत सविस्तर माहिती दिली. अभियानाचे जिल्हा संयोजक मकरंद उर्फ आशिष खातू यांनी प्रशिक्षणासंदर्भात सविस्तर माहिती दिली. कार्यशाळेतील वक्त्यांना देण्यात येणाऱ्या सात प्रमुख विषयांबाबत रत्नागिरी जिल्हा उपाध्यक्ष बळीराम मोरे यांनी सविस्तर माहिती दिली. कार्यशाळेत मार्गदर्शन करण्यासाठी जिल्ह्यातून ३१ अनुभवी वक्त्यांची नेमणूक करण्यात आली आहे. प्रत्येक मंडळामध्ये या कार्यशाळा होणार आहेत. या कार्यशाळेमध्ये एकूण सात सत्र असतील. या कार्यशाळेत इतिहास आणि विकास, वैचारिक अधिष्ठान, कार्यपद्धती, आपल्या सरकारची कामगिरी व अंमलबजावणी, बूथ व्यवस्थापन, सोशल मीडियासारख्या विविध विषयांवर मार्गदर्शन करण्यात येणार आहे. ही कार्यशाळा भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांना पक्षबांधणीसाठी महत्त्वाची ठरणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Video : मुख्यमंत्री मद्यप्राशन करून विधानसभेत पोहोचले? अकाली दलने शेअर केला व्हिडीओ, डोपिंग टेस्टची मागणी...

Crime: जमिनीच्या वादातून तरुणाला संपवलं; नंतर मृतदेहाची जंगलात विल्हेवाट, ठाण्यातील प्रसिद्ध रीलस्टारला अटक, १२ वर्षांनी गूढ उलगडलं

Anewadi Toll Traffic Jam : पुणे-बंगळुरू हायवेवर 5 किमीच्या रांगा! आनेवाडी टोलवर मुंबई–पुण्यातील चाकरमानी अडकले; सलग सुट्ट्यांमुळे महामार्गावर प्रचंड गर्दी

Latest Marathi News Live Update : चंद्रपूर वीज केंद्रात पाचशे मेगावॉट वीजनिर्मिती ठप्प

आईकडून मिळणारी तात्पुरती प्रतिकारशक्ती संपण्यापूर्वी लसीकरण का आवश्यक असतं? जन्मानंतरच्या पहिल्या डोसबद्दल जाणून घ्या

SCROLL FOR NEXT