Bhagwant Mann Drunk Allegation Row
esakal
शिरोमणी अकाली दलने मुख्यमंत्री भगवंत मान यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. भगवंत मान हे विधानसभेत मद्यप्राशन करून आले, असा दावा अकाली दलकडून करण्यात आला आहे. त्यामुळे पंजाबमधील राजकीय वातावरण पुन्हा एकदा तापलं आहे. अकालीदलने सोशल मीडियावर एक व्हिडिओसुद्धा शेअर केला आहे. तसेच मुख्यमंत्री मान यांचा तातडीने डोप टेस्ट करावी, अशी मागणीही त्यांनी केली आहे.