कोकण

आंबवच्या अभियांत्रिकी महाविद्यालयात बीएस सिक्सवर प्रशिक्षण

CD

‘आंबवच्या अभियांत्रिकी’त
बीएस सिक्सवर प्रशिक्षण
देवरूख, ता. १४ ः आंबव येथील प्रबोधन शिक्षण प्रसारक संस्था संचलित राजेंद्र माने अभियांत्रिकी व तंत्रज्ञान महाविद्यालयात ऑटोमोबाईल विभागाच्यावतीने विद्यार्थ्यांसाठी बीएस सिक्स या प्रगत उत्सर्जन मानकावर आधारित विशेष प्रशिक्षण कार्यक्रम झाला. शिबिरात ७२ विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत आधुनिक इंजिन तंत्रज्ञानाचे धडे गिरवले.
शिबिराचे उद्‍घाटन संस्थेचे संस्थापक रवींद्र माने यांनी केले. या वेळी प्राचार्य डॉ. महेश भागवत, उपप्राचार्य व ट्रेनिंग अँड प्लेसमेंट विभागप्रमुख डॉ. अनिरुद्ध जोशी, सिंधुदुर्ग मेकॅनिक असोसिएशन (कणकवली शाखा) अध्यक्ष नितीन तावडे, संदीप पारकर, प्रशांत राणे आणि दशरथ चव्हाण आदी उपस्थित होते. प्राचार्य डॉ. महेश भागवत यांनी सांगितले की, २०२० पासून भारतात अनिवार्य करण्यात आलेल्या बीएस सिक्स मानकांमुळे वाहनांचे प्रदूषण लक्षणीयरित्या कमी होण्यास मदत होत आहे. या शिबिरामुळे विद्यार्थ्यांना या मानकांच्या विविध तांत्रिक पैलूंचे सखोल ज्ञान मिळेल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

वाहतुकीबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदींचं पुन्हा आवाहन, आर्थिक सल्लागार परिषद बैठकीत चर्चा

Success Story : चूल आणि मूल सोडून उभा केला कोट्यवधींचा 'देहाती' ब्रॅंड! ग्रामीण पर्यटनाचे नवे केंद्र बनतेय हे गाव

आजचे पंचांग आणि दिनविशेष - 07 जून 2026

आजचे राशिभविष्य - 07 जून 2026

Taj Viral Video : ताजमहालच्या हौदात माकडांची धम्माल 'पूल पार्टी'! व्हिडिओ व्हायरल होताच पर्यटकांची गर्दी; अधिकाऱ्यांनी दिले स्पष्टीकरण

SCROLL FOR NEXT