

PM Narendra Modi
esakal
सकाळ न्यूज नेटवर्क नवी दिल्ली, ता. ६ ः पश्चिम आशियातील वाढता संघर्ष, ऊर्जा बाजारातील चढ-उतार आणि जागतिक आर्थिक अनिश्चिततेच्या पार्श्वभूमीवर भारताच्या आर्थिक विकासाचा वेग कायम राखण्यासाठीच्या उपाययोजनांवरील आर्थिक सल्लागार परिषदेच्या चर्चेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुलभ राहणीमान आणि व्यवसाय सुलभतेमधील आवश्यक सुधारणांवर भर दिला. परकीय चलनसाठ्यावरील दबाव कमी करण्यासाठी सार्वजनिक वाहतुकीचा अधिक वापर करण्याचे आवाहनही त्यांनी नागरिकांना केले.