कोकण

रत्नागिरी- नृसिंह अवतार देखावा ठरला लक्ष्यवेधी

CD

rat20p3.jpg
32133
रत्नागिरी : श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानतर्फे स्वागतयात्रेत हिरण्यकश्यपाचा वध व नृसिंह अवतार देखावा सादर करताना कलाकार.

श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचा
नृसिंह अवतार देखावा लक्ष्यवेधी
रत्नागिरी, ता. २० : हिंदू नववर्ष स्वागतयात्रेनिमित्त श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान संस्थेतर्फे सादर करण्यात आलेल्या ‘हिरण्यकश्यपाचा वध व नृसिंह अवतार’ या सजीव देखाव्याने नागरिकांची मने जिंकली. पौराणिक कथेला साजेशा भव्य मांडणीसह सादर झालेला हा देखावा अत्यंत उत्कंठावर्धक व नाट्यमय ठरला.
यात्रेदरम्यान साकारण्यात आलेल्या या प्रसंगात हिरण्यकश्यपाच्या अत्याचारांचे प्रभावी चित्रण करण्यात आले. त्यानंतर भगवान विष्णूंच्या नृसिंह अवताराचे दर्शन घडवत हिरण्यकश्यपाचा वध दाखवण्यात आला. या संपूर्ण सादरीकरणात कलाकारांच्या अभिनयाने आणि ध्वनीप्रकाश संयोजनाने थरारक वातावरण निर्माण केले होते. उपस्थित नागरिकांनी टाळ्यांच्या कडकडाटात या देखाव्याचे कौतुक केले.
देखाव्याची मांडणी, वेशभूषा आणि संवाद यामुळे प्रेक्षक अक्षरशः मंत्रमुग्ध झाले. विशेषतः नृसिंह अवताराचा उग्र आणि तेजस्वी आविष्कार पाहताना उपस्थितांमध्ये भक्तिभाव आणि रोमांच यांचा संगम अनुभवायला मिळाला. हिंदू नववर्षाच्या स्वागतासाठी आयोजित या यात्रेत विविध धार्मिक व सांस्कृतिक देखावे सादर करण्यात आले होते. ‘हिरण्यकश्यपाचा वध व नृसिंह अवतार’ हा देखावा विशेष आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरला. श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान संस्थेच्या या उपक्रमामुळे नववर्ष स्वागतयात्रेला एक वेगळे धार्मिक आणि सांस्कृतिक महत्त्व प्राप्त झाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Petrol Diesel Price Hike India : सामान्यांना इंधन दरवाढीचा पुन्हा झटका! आठवड्यात दुसऱ्यांदा पेट्रोल-डिझेल महागले

Panchang 19 May 2026 : पंचांग! शुभ मुहूर्त, राहुकाळ, तिथी-नक्षत्र आणि आजचे धार्मिक महत्त्व

वाहन नाही, तरी महिलांच्या नावे वाहनांची नोंद! जाब विचारायला २००० महिला सोलापूरच्या महिला व बालविकास कार्यालयात, ई-केवायसी केली, दुरुस्तीही केली, तरी लाभ बंद

आजचे राशिभविष्य - १९ मे २०२६

Healthy and Tasty Breakfast Smoothie: सकाळच्या घाईत नाश्ता स्किप करू नका; फक्त 3 पदार्थांत तयार करा हेल्दी आणि टेस्टी स्मूदी

SCROLL FOR NEXT