कोकण

रत्नागिरी ः बदलत्या प्रवाहांचे स्वागत करण्यासाठी सज्जता हवी

CD

rat23p2.jpg-
32671
नाशिक : विश्व मराठी संमेलनात परिसंवाद कार्यक्रमात बोलताना रत्नागिरी जिल्हा नगर वाचनालयाचे अध्यक्ष दीपक पटवर्धन. सोबत सुषमा दातार, लतिका भानुशाली, प्रकाश पारखी आदी.

बदलत्या प्रवाहांचे स्वागत करण्यासाठी सज्जता हवी
पटवर्धन; प्रकाशनातील बदलते प्रवाह या परिसंवाद
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. २३ : प्रकाशनाचे प्रवाह बदलत राहणार ते अपरिहार्य आणि आवश्यक ही आहे. नव्या युगातील डिजिटल माध्यमांचा प्रभावी उपयोग करत बदलत्या प्रवाहांचे स्वागत करण्यासाठी सज्जता हवी, असे प्रतिपादन रत्नागिरी जिल्हा नगर वाचनालयाचे अध्यक्ष अॅड. दीपक पटवर्धन यांनी केले.
नाशिक येथील रावसाहेब थोरात सभागृहात विश्वमराठी संमेलनात प्रकाशनातील बदलते प्रवाह या परिसंवादात ते बोलत होते. त्यांनी साहित्यात बदल अपरिहार्य आहे. प्रकाशन क्षेत्राचे स्वरूप बदलले आहे. प्रकाशनांमध्ये विविध विषयांवर ग्रंथ येत आहेत. ग्रामीण साहित्यही मोठ्या प्रमाणावर येत असून, भारतीय संस्कृती, संरक्षणक्षेत्रातील डावपेच, पौराणिक संदर्भातून नव्या मांडणीची प्रकाशने, अनुवादित पुस्तके आदी नवी नवी प्रकाशने आज प्रकाशित होत आहेत. या युगात युवकांना आकर्षित करायचं असेल तर डिजिटल माध्यम प्रभावीपणे प्रकाशन क्षेत्रांत वापरली गेली पाहिजेत, असं मत अॅड. पटवर्धन यांनी नोंदवले. महाराष्ट्रात लहान-मोठ्या शहरात ग्रंथविक्री करणारी दुकाने उघडली पाहिजेत ज्यामुळे प्रकाशकांना त्यांचे ग्राहक सहजपणे उपलब्ध होतील. दुर्दैवाने, मोठ्या शहरांचा अपवाद वगळता क्वचितच शहरात दुकाने आहेत ती सर्वत्र उघडली पाहिजेत, असेही सांगितले.
रत्नागिरी जिल्हा नगर वाचनालयाच्या द्विशतकी देदिप्यमान प्रदीर्घ कारकिर्दीचा आलेख अॅड. पटवर्धन यांनी मांडला. या परिसंवादाचे संयोजन शुभदा फडणवीस यांनी अभ्यासपूर्ण शैलीत केले. या परिसंवादात सुषमा दातार, लतिका भानुशाली, प्रकाश पारखी यांनीही आपले अभ्यासपूर्ण मुद्दे मांडले.
प्रकाशनात बदल स्वाभाविक आहेत. जगाच्या वेगवान प्रगतीत घडणाऱ्या गोष्टी, बदललेली कार्यपद्धती, तंत्रज्ञानात झालेले बदल हे जाणवत आहेत. हे बदल असेच सुरू राहणार. आपण वाचकांना वाचनसंस्कृतीबरोबर संलग्न ठेवण्यासाठी प्रामुख्याने युवापिढीला प्रेरणा मिळेल अशी व्यवस्था निर्माण करूया, असे प्रतिपादन संयोजिका शुभदा फडणवीस यांनी केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

कूलिंग चेंबरमध्ये स्फोटानंतर इमारत कोसळली, ९ कामगारांचा मृत्यू; माजी आमदाराच्या मालकीच्या कोल्ड स्टोरेजमध्ये दुर्घटना

Navi Mumbai: मुलगा घरी एकटाच, पालक घरी येताच समोर जे दिसलं त्यानं पायाखालची जमीनच सरकली, नवी मुंबईत काय घडलं?

IPL 2026 Video: धोनी वयाच्या ६० व्या वर्षापर्यंत खेळणार? थालाचं उत्तर ऐकून आख्ख्या स्टेडियममध्ये जल्लोष

अमेरिकेचं एक पाऊल मागे, युद्धाला ब्रेक! इराणसोबत सकारात्मक चर्चा, डोनाल्ड ट्रम्प यांनी घेतला मोठा निर्णय

महागड्या फेरारीतही हार्दिक ऐकतो 'हा' मंत्र; म्हणाला - "याहून पॉझिटिव्ह काहीच नाही!" पाहा Viral Video

SCROLL FOR NEXT