कोकण

डोर्ले कुटूंबियांकडून जि. प. शाळेला देणगी

CD

डोर्ले कुटूंबियांकडून
जि. प. शाळेला देणगी
लांजा, ता. १ ः स्वर्गीय तातोबा उर्फ काका महादेव डोर्ले यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ आणि युगा प्रसाद डोर्ले हिच्या वाढदिवसानिमित्त लांजा शहरातील ‘पीएमश्री जिल्हा परिषद शाळा क्र. ५’ ला भाषण मंच देणगी स्वरूपात प्रदान करण्यात आला. डोर्ले कुटूंबाने सामाजिक बांधिलकी जोपासत समाजासमोर आदर्श ठेवला आहे.
तालुक्यातील शिक्षण क्षेत्रात स्वर्गीय तातोबा उर्फ काका डोर्ले यांचे योगदान अत्यंत मोलाचे राहिले आहे. त्यांनी न्यू एज्युकेशन सोसायटी, लांजाचे अध्यक्ष म्हणून प्रदीर्घ काळ सेवा बजावली होती. त्यांच्या कार्याची आठवण आणि नातीच्या वाढदिवसाचे औचित्य साधून या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या निमित्ताने लांजा शहरातील ‘पीएमश्री जिल्हा परिषद शाळा क्र. ५’ ला एक भव्य भाषण मंच देणगी स्वरूपात प्रदान करण्यात आला. ‘सोसायटी मेडिकल’च्या वतीने देण्यात आलेल्या या पोडियमची किंमत सुमारे ३० हजार रुपये आहे. शाळेतील पालक-शिक्षक सभा, शैक्षणिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांच्या आयोजनासाठी या मंचाचा मोठा उपयोग होणार आहे.
शाळेत आयोजित विविध गुणदर्शन कार्यक्रमादरम्यान प्रसाद डोर्ले आणि त्यांच्या पत्नीचा विशेष सत्कार करून शाळेच्या वतीने कृतज्ञता व्यक्त करण्यात आली. यावेळी मुख्याध्यापक विश्वनाथ सुर्वे आणि शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा प्रियांजली कुरूप यांनी डोर्ले परिवाराचे आभार मानले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

महागाईचा भडका! घरगुती LGP सिलिंडरच्या दरात वाढ, १४.२ किलो सिलिंडरची नवी किंमत किती

वाहतुकीबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदींचं पुन्हा आवाहन, आर्थिक सल्लागार परिषद बैठकीत चर्चा

Success Story : चूल आणि मूल सोडून उभा केला कोट्यवधींचा 'देहाती' ब्रॅंड! ग्रामीण पर्यटनाचे नवे केंद्र बनतेय हे गाव

आजचे पंचांग आणि दिनविशेष - 07 जून 2026

आजचे राशिभविष्य - 07 जून 2026

SCROLL FOR NEXT