कोकण

बांदा महावितरण कार्यालयांना जिल्हा परिषदेकड़ून ‘वूड कटर’

CD

59116

बांदा महावितरण कार्यालयांना
जिल्हा परिषदेकड़ून ‘वूड कटर’
बांदा ः सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेचे अध्यक्ष प्रमोद कामत यांनी आज सकाळी महावितरणच्या बांदा कार्यालयाला सदिच्छा भेट देत बांदा पंचक्रोशीतील वीजपुरवठ्याच्या विविध समस्यांची माहिती जाणून घेतली. यावेळी त्यांनी सहाय्यक अभियंता वैष्णव कांबळे व कर्मचाऱ्यांशी संवाद साधून वीजपुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी आवश्यक उपाययोजनांबाबत चर्चा केली. बांदा पंचक्रोशीतील गावांमध्ये वारंवार खंडित होणारा वीजपुरवठा, वीजवाहिन्यांवरील देखभाल-दुरुस्तीची कामे, तांत्रिक बिघाड तसेच पावसाळ्यात उद्भवणाऱ्या विविध समस्या याबाबत यावेळी चर्चा करण्यात आली. दरम्यान, बांदा-१ व बांदा-२ महावितरण कार्यालयासाठी प्रत्येकी एक वूड कटर कामत यांच्या हस्ते सुपूर्द करण्यात आला. वीजवाहिन्यांवर झाडांच्या फांद्या पडणे किंवा झाडांमुळे वीजपुरवठ्यात अडथळे निर्माण होणे अशा परिस्थितीत हे यंत्र अत्यंत उपयुक्त ठरणार आहे. त्यामुळे तांत्रिक कर्मचाऱ्यांना वीजपुरवठा पूर्ववत करण्यास अधिक वेगाने कार्यवाही करता येणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Dal Prices: सणासुदीपूर्वी महागाईचा झटका! साखर-कांद्यानंतर आता डाळी महागल्या, जाणून घ्या नवे दर...

Sugar Stocks: साखर तुमच्यासाठी महागली, मात्र शेअर्ससाठी 'गोड' झाली! साखर कंपन्यांचे अनेक शेअर्स 52-Week High वर

Marathi News Live Updates : शेतकरी कर्जमाफीचा दुसरा हप्ता वितरीत

कल्याणमध्ये डॉक्टरांवर पुन्हा हल्ला! रुग्णाच्या नातेवाईकाकडून अरेरावीची भाषा वापरत बेदम मारहाण; धक्कादायक घटना CCTVत कैद

MHADA: भाडेतत्त्वावरील घरांसाठी नवे धोरण; म्हाडाचे घर भाड्याने कसे घेता येणार? वाचा सविस्तर

SCROLL FOR NEXT