कोकण

दाभोलकर प्रकरणाचा तपास बंद का केला?

CD

दाभोलकर प्रकरणाचा
तपास बंद का केला?
---
सर्वोच्च न्यायालयाचे ‘सीबीआय’ला खुलाशाचे आदेश
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १८ : अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे सर्वेसर्वा डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्या प्रकरणाचा तपास बंद करण्याच्या निर्णयावर सर्वोच्च न्यायालयाने ‘सीबीआय’ला आज नोटीस बजावली आहे. दाभोलकर हत्या प्रकरणाचा तपास बंद का केला, याचा खुलासा करण्याचे निर्देश न्यायालयाने दिले. दाभोलकर यांचे कुटुंबीय मुक्ता आणि हमीद दाभोलकर यांनी तपास बंद करण्याच्या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयात याचिकेद्वारे आव्हान दिले होते.
न्यायमूर्ती संजय किशन कौल आणि न्यायमूर्ती ए. अमनउल्लाह यांच्या खंडपीठासमोर झालेल्या सुनावणीत दाभोलकर यांच्यातर्फे ॲड. आनंद ग्रोव्हर आणि ॲड. किशन कुमार यांनी बाजू मांडली. मुंबई उच्च न्यायालयाने ‘सीबीआय’चा निर्णय कायम ठेवला आणि खटला सुरू झाल्याने तपासावर देखरेख करणार नाही, अशी भूमिका उच्च न्यायालयाने घेतली होती. मात्र, अद्याप या हत्याकांडात मुख्य सूत्रधार कोण आहे, याचा तपास लागलेला नाही. त्यामुळे अन्य विवेकवादी विचारसरणीच्या समाजधुरिणांना धोका असू शकतो. दाभोलकर यांच्यासह कॉ. गोविंद पानसरे, पत्रकार गौरी लंकेश, प्रा. एम. एम. कलबुर्गी यांची हत्या हे एकत्रित कटकारस्थान आहे, हे उपलब्ध पुराव्यांवरून स्पष्ट होते. त्यामुळे हा तपास पूर्णत्वास यायला हवा, असा युक्तिवाद दाभोलकर यांच्या वतीने करण्यात आला. सर्वोच्च न्यायालयाने याचिकेची दखल घेतली असून, ‘सीबीआय’ला भूमिका स्पष्ट करण्याचे निर्देश दिले आहेत.
या प्रकरणात आरोपपत्र दाखल होऊन खटला सुरू झाल्याने यावर आता कायद्यानुसार उच्च न्यायालयाने देखरेख ठेवू नये, अशी मागणी करणारी याचिका आरोपी शरद कळसकर आणि विक्रम भावे यांनी उच्च न्यायालयात केली होती. याचिकेवरील सुनावणीदरम्यान ‘सीबीआय’ने तपास बंद करीत असल्याची माहिती न्यायालयात दिली होती.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Lok Sabha Hatkanangale: निवडणुकीच्या रिंगणात असलेल्या राजू शेट्टींना चित्रपटात काम करावसं का वाटलं? जाणून घ्या

Gulabrao Patil: भाजपवाल्यांनी काम केलं नाही तर आम्ही... गुलाबराव पाटलांच्या वक्तव्यामुळे BJP कार्यकर्त्यांमधे संभ्रम

Bajrang Punia Suspended : बजरंग पुनियाचे स्वप्न भंगले... डोपिंग टेस्ट न केल्याने निलंबित

Summer Fashion Tips : उन्हाळ्यात कूल आणि स्टायलिश दिसायचंय? मग, अशा प्रकारच्या कलर पॅटर्न्सची करा निवड

Raju Shetti in Hatkanangale: 'राजकारणात यायचं म्हणजे गेंड्याची कातडी लागते'; राजकारण की चळवळ, राजू शेट्टींची कशाला पसंती?

SCROLL FOR NEXT