कोकण

आचार्य बाळकृष्ण यांच्या वाढदिवसानिमित्त वनौषधी दिवस साजरा

CD

59471

पतंजली योग विद्यापीठातर्फे
नव्या आयुर्वेदिक औषधांचे लोकार्पण

वनौषधी दिवस; विविध आयुर्वेदिक औषधांवरील ग्रंथांचेही प्रकाशन

हरिद्वार, ता. ४ ः वनौषधी पंडित आचार्य बाळकृष्ण महाराज यांचा वाढदिवस ‘वनौषधी दिवस’ कार्यक्रमाच्या माध्यमातून पतंजली योग विद्यापीठातील पतंजली वेलनेस केंद्रात शुक्रवारी साजरा झाला. या प्रसंगी विविध आयुर्वेदिक औषधांवरील विविध ग्रंथांचे प्रकाशनही झाले.
आचार्य बाळकृष्ण महाराज यांनी लिहिलेल्या पुस्तकांचे या प्रसंगी प्रकाशन झाले. तसेच त्यांनी तयार केलेल्या वनौषधांचे लोकार्पण करण्यात आले.
यावेळी रामदेव बाबा यांनी अमेरिकेतून त्यांना दूरध्वनीहून शुभेच्छा दिल्या. ते म्हणाले, ‘‘आचार्य बाळकृष्ण हे प्रतिभावंत असून आयुर्वेद, शिक्षण, साहित्य, समाजसेवा, कृषी आदी अनेक क्षेत्रांत त्यांचा अभ्यास असून त्यात त्यांनी मोठे कार्य केले आहे. त्यांची साधना नव्या पिढीलाही प्रेरणादायी आहे.’’
आचार्य बाळकृष्ण यावेळी म्हणाले, ‘वाढदिवसानिमित्त समाजासाठी अनेक गुणकारी औषधे तसेच नोझल स्प्रे, लहान मुलांची प्रतिकार क्षमता वाढावी, यासाठी लिवोग्रिट व इम्युनोग्रिट सिरप, च्यवनप्राश जेली आदी उत्पादनांचे लोकार्पण केले आहे.’ यावेळी त्यांच्या आयुर्वेदिक औषधांच्या १११ खंडांचे प्रकाशन करण्यात आले. या खंडावर पतंजली संस्थेतील अनेक तज्ज्ञांनी प्रदीर्घ काळ काम केले आहे. तसेच ‘फ्लोरा ऑफ राष्ट्रपती भवन’, ‘मेडिसिनल प्लांट्स ऑफ राष्ट्रपती भवन’, ‘फ्लोरा ऑफ सिजूसा-अरुणाचल प्रदेश’ आणि ‘विश्व वनस्पती कोष भाग-६’चे प्रकाशन झाले. यावेळी पतंजली ग्रामोद्योगचे महामंत्री यशदेव शास्त्री, पतंजली अनुसंधान संस्थेचे मुख्य संशोधक डॉ. अनुराग वार्ष्णेय यांच्या नेतृत्वाखाली रक्तदान शिबिर, नेत्र व दंत तपासणी शिबिर पार पडले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ryan Rickeltonने इतिहास रचला! जयसूर्या, तेंडुलकर यांचा विक्रम मोडला; जगात असा पराक्रम करणारा पहिलाच फलंदाज ठरला...

Mumbai: मुंबई विद्यापीठ आखाडा नाही! भदंत विमांसा यांना उच्च न्यायालयाचा इशारा

Shirur Alimony Dispute: शिरूरमध्ये पोटगीच्या वादातून पती-पत्नीची रस्त्यावर हाणामारी; परस्परांविरुद्ध गुन्हे दाखल

Latest Marathi News Live Update : महाराष्ट्रासह देशभरातील महत्त्वाच्या घडामोडी वाचा एका क्लिकवर...; पाहा कुठे काय घडलं?

दाभोलकर हत्या प्रकरणी कळसकर हल्लेखोर असल्याच्या साक्षीदारांच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह, उच्च न्यायालयाचे निरीक्षण

SCROLL FOR NEXT