कोकण

रिअल इस्टेट एजंटचे ऑफलाइन प्रशिक्षण

CD

नोंदणीकृत रिअल इस्टेट एजंट
होण्यासाठी सोमवारपासून प्रशिक्षण
ऑनलाईन, ऑफलाईन प्रशिक्षण घेण्याची संधी
पुणे, ता. ३१ : परीक्षेसह २० तासांचे ऑनलाइन व तीन दिवसांचे ऑफलाइन प्रशिक्षण आता महारेराद्वारे सर्व रिअल इस्टेट एजंटना बंधनकारक केले आहे. ‘एसआयआयएलसी’ ही महारेराची अधिकृत प्रशिक्षण भागीदार संस्था आहे. आतापर्यंत ९०० हून अधिक उमेदवारांनी संस्थेतर्फे हे प्रशिक्षण पूर्ण केले आहे. २० मे रोजी महारेरातर्फे झालेल्या ऑनलाइन परीक्षेमध्ये एकूण ४२३ उमेदवारांनी सहभाग नोंदविला होता. त्यातून ४०५ उमेदवार यशस्वी झाले असून निकालाची टक्केवारी ९६ टक्के आहे.
महारेराने १० जानेवारी २०२३ च्या आदेशान्वये एजंटच्या नवीन नोंदणी आणि नूतनीकरणासाठी प्रशिक्षण घेऊन विहित प्रमाणपत्र प्राप्त केलेले असणे बंधनकारक केलेले आहे. सध्याच्या सुमारे ३९ हजार एजंटनाही एक सप्टेंबरपूर्वी हे प्रशिक्षण पूर्ण करून प्रमाणपत्र प्राप्त करावे लागणार आहे. महारेराने नवीन एजंट नोंदणीसाठी तसेच नूतनीकरणासाठी पोर्टल बंद केले आहे. लवकरच पुढील परीक्षेसाठी महारेराचे पोर्टल उघडले जातील, त्यापूर्वी प्रशिक्षण पूर्ण आवश्यक आहे. गुरुवारपासून (ता. १) या प्रशिक्षणाची ऑनलाइन व येत्या सोमवारपासून (ता. ५) ऑफलाइन बॅच सुरू होत आहे. प्रत्येक बॅचला मर्यादित जागा असल्याने लवकरात लवकर नोंदणी पूर्ण करणे आवश्यक आहे.

ठळक
नावनोंदणी व अधिक माहितीसाठी संपर्क : ९१३००७०१३२, ८९५६३४४४७५, ७३५०००१६०३.

प्रशिक्षणाची आवश्यकता का?
बिल्डरांच्या मनमानीपासून जनतेला वाचविण्यासाठी सरकारने रेरा कायदा तयार केला आहे. सरकारने ग्राहकांचे हित समोर ठेवून व त्याच्या रक्षणासाठी हा कायदा केला आहे; परंतु रिअल इस्टेट एजंटला या क्षेत्रातील नियम, कायदे आणि कागदपत्रांची पूर्ण माहिती नसते, असे आढळले आहे. त्यामुळे ग्राहकांचे हाल होत होते. या उणिवा दूर करण्यासाठी आता थेट ग्राहकांशी संपर्क साधणाऱ्या रिअल इस्टेट एजंटना प्रशिक्षण देण्याचा निर्णय घेतला आहे. जेणेकरून तो ग्राहकांना प्रकल्प आणि विकसकाची योग्य माहिती देऊ शकेल.

कारवाई होणार?
परीक्षा उत्तीर्ण झाल्याशिवाय कोणीही स्थावर मालमत्तांचे मार्केटिंग आणि विक्री करू शकणार नाही, तसेच त्याची रेरामध्ये नोंदणीही केली जाणार नाही. रेरा प्रमाणपत्राशिवाय मालमत्ता विकताना आढळल्यास त्या व्यक्तीवर कायदेशीर कारवाई केली जाणार आहे, असा इशारा महारेराने दिला आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Onion Garlands During Voting: गळ्यात टोमॅटो-कांद्याच्या माळा घालून मतदान; नाशिकमध्ये युवा मतदारांची चर्चा

Maharashtra Lok Sabha 2024 Phase 5 Election Voting LIVE: महाराष्ट्रात मतदारांमध्ये अनुत्साह, अकरा वाजेपर्यंत अवघे 16 टक्के मतदान

Bangladesh MP Missing: भारतात आलेला बांगलादेशचा खासदार 3 दिवसांपासून बेपत्ता; कुटुंबाकडून चिंता व्यक्त

RSS नंतर आता दिग्विजय सिंह यांनी CM योगींचे केले कौतुक मात्र मोदींवर खोचक टीका, नेमकं काय म्हटलं वाचा...

Healthy Tips: आता कमी वयातच पोटाचा वाढतोय घेर, जास्त चरबीमुळे हृदयविकार, मधुमेह, आजारांना निमंत्रण

SCROLL FOR NEXT