पुणे : थिअरी नव्हे तर प्रत्यक्ष अनुभव अशी टॅगलाइन घेऊन आयोजित करण्यात येत येणारा एकमेव इव्हेंट मॅनेजमेंट कोर्स विषयी अधिक माहिती देणारा विनामूल्य वेबिनार शनिवारी (ता. ५) सायंकाळी ७.३० ते ८.३० यावेळेत होणार आहे. इव्हेंट मॅनेजमेंट उद्योग झपाट्याने विकसित होत असला तरी अनेक अभ्यासक्रम केवळ कॉर्पोरेट इव्हेंट्स आणि थिअरी शिकवतात. प्रत्यक्ष अनुभवाचा अभाव असल्यामुळे नवोदित इव्हेंट मॅनेजर्सना खऱ्या आव्हानांचा सामना करावा लागतो. हीच गरज ओळखून, इव्हेंट मॅनेजमेंट क्रॅश कोर्स सादर करण्यात आला आहे, जो थिअरीपेक्षा प्रॅक्टिकल लर्निंगला प्राधान्य देतो. या कोर्समध्ये प्रत्यक्ष कार्यक्रम नियोजन आणि अंमलबजावणीचा अनुभव घेण्याची संधी विद्यार्थ्यांना मिळणार आहे. अशा प्रकारचा हा भारतातला पहिलाच उपक्रम आहे. या कोर्समध्ये सहभागी होणाऱ्यांना केवळ पुस्तकी ज्ञान न देता प्रत्यक्ष अनुभव देण्यावर भर दिला आहे. या कोर्समध्ये लाइव्ह फील्ड एक्सपिरियन्स, इव्हेंट सेटअप, डेकोरेशन, ड्रेपिंग आणि व्यवस्थापनाचे प्रात्यक्षिक, इंडस्ट्री-ओरिएंटेड ट्रेनिंग, अनुभवी आणि नावाजलेल्या मेंटर्सकडून मार्गदर्शन, बजेट मॅनेजमेंट, कॉर्पोरेट इव्हेंट्सचे ज्ञान आदी विषयांचा समावेश आहे.
या कोर्समध्ये अनुभवी आणि नामांकित मार्गदर्शक सहभागी होत आहेत. त्यांच्या प्रत्यक्ष अनुभवातून शिकण्याची संधी विद्यार्थ्यांना मिळणार आहे, जेणेकरून इव्हेंट मॅनेजमेंटचे बारकावे आणि समस्या हाताळण्याचे कौशल्य आत्मसात करता येईल. हे सर्व मार्गदर्शक इव्हेंट इंडस्ट्रीमध्ये जवळपास दोन दशकांहून अधिक काम करणारे व्यावसायिक आहेत. यांचे अनुभव, माहिती आणि यांचे कौशल्य आत्मसात करण्याची ही नामी संधी असणार आहे.
कोर्सची रचना १० सत्रांमध्ये करण्यात आली आहे. प्रत्येक सत्र ३ ते ४ तासांचे असणार असून यात इव्हेंट मॅनेजमेंटच्या सर्व महत्त्वाच्या पैलूंवर भर दिला जाणार आहे. यात केवळ थिअरीच नाही तर प्रॅक्टिकल सोल्यूशन्स, लॉजिस्टिक्स हँडलिंग आणि क्रिएटिव्ह एक्सिक्युशन शिकवले जाणार आहे. इव्हेंट मॅनेजमेंट शिकू इच्छिणारे विद्यार्थी, इव्हेंट मॅनेजमेंटमध्ये करिअर घडवू इच्छिणारे पदवीधर, आपल्या स्वतःच्या व्यवसायात दर्जेदार इव्हेंट्स आयोजित करू इच्छिणारे उद्योजक, नव्या क्षेत्रात करिअर करण्यास इच्छुक व्यावसायिक, महिला, यांच्यासाठी हा कोर्स उपयुक्त आहे. इव्हेंट मॅनेजमेंट शिक्षणाचे भविष्य, इव्हेंट इंडस्ट्रीतील वाढती मागणी लक्षात घेता, हा कोर्स विद्यार्थ्यांना अत्यावश्यक कौशल्ये मिळवून देईल. अनुभवी मेंटॉर्स, इव्हेंट हाताळण्याचा थेट अनुभव आणि उत्तम अभ्यासक्रम यांचा मिलाफ म्हणजे हा कोर्स आहे. यासंदर्भात अधिक माहिती वेबिनारमध्ये दिली जाणार आहे. वेबिनारमध्ये रमेश पाटणकर, तन्मय सावर्डेकर, प्रवीण जोशी हे मार्गदर्शन करणार आहेत
अधिक माहितीसाठी संपर्क : ८४८४८११५४४
क्यूआर कोड
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.