Nashik Dindori Car Accident : नाशिकच्या दिंडोरीत कार विहिरीत कोसळली, ७ विद्यार्थ्यांसह ९ जणांचा दुर्दैवी अंत, ​स्नेहसंमेलन आटोपून घरी परतताना घटना

Nashik Car Accident News : नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी येथे भीषण अपघात घडला. स्नेहसंमेलन आटोपून घरी परतताना कार विहिरीत कोसळल्याने ७ विद्यार्थ्यांसह ९ जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला.
Nashik Dindori Car Accident 9 death

Nashik Dindori Car Accident 9 death

esakal

Updated on

Nashik Dindori Accident 9 Dead : (​दिगंबर पाटोळे) वणी (नाशिक) : दिंडोरी शहरात शुक्रवारी रात्री काळजाचा थरकाप उडवणारी घटना घडली. एका खाजगी क्लासचे वार्षिक स्नेहसंमेलन आणि गुणगौरव समारंभ आटोपून घरी परतत असताना, विद्यार्थ्यांसह पालकांची कार विहिरीत कोसळून ९ जणांचा जागीच मृत्यू झाला. मृतांमध्ये ७ विद्यार्थी आणि २ पालकांचा समावेश असल्याचे प्राथमिक वृत्त आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com