कोकण

जयगड बंदरातून वर्षभरात दोन लाखांवर टन साखर निर्यात

सुधाकर काशिद

कोल्हापूर - रस्ते महामार्ग होण्यापूर्वी कोल्हापुरात व्यापारासाठी समुद्र मार्गाचाच म्हणजे कोकणातल्या बंदराचाच कसा आधार होता, याची प्रचिती पुन्हा जयगड बंदरामुळे येथील वाहतूक व व्यापारी क्षेत्राला आली आहे. जयगड येथील आंग्रे पोर्ट प्रायव्हेट लिमिटेड (चौगुले ग्रुप) च्या आंग्रे बंदरातून गेल्या वर्षात तब्बल दोन लाख पाच हजार मेट्रिक टनाच्या आसपास साखर निर्यात झाली आहे. ही सर्व साखर कोल्हापूर, सांगली, बेळगाव परिसरातील साखर कारखाने व साखर व्यावसायिकांची आहे. जलमार्गाचा आधार हा एखाद्या परिसराच्या किंवा उद्योगाच्या विकासासाठी परिणामकारक ठरू शकतो, याचे हे उदाहरण ठरले आहे. हे बंदर नव्याने सुरू होण्यापूर्वी ही सर्व साखर मुंबईहून (जे.एन.पी.टी.) निर्यात करावी लागत होती. 

याशिवाय मुंबई, गोवा या क्रूझ प्रवासासाठी आंग्रे बंदर हा एक स्टॉल झाला आहे. नुकतेच पहिले क्रूझ काही या बंदरात थांबले होते.  गेली कित्येक शतके कोकणातील बंदरे हाच कोल्हापूरच्या व्यापारी उलाढालीचा भाव होता; मात्र बंदरे बंद होत गेली व मुंबईचे पोर्ट ट्रस्ट हाच एक आधार राहिला. परिणामी कोल्हापूर ते मुंबईचे पोर्ट ट्रस्ट हाच एक आधार राहिला. परिणामी कोल्हापूर ते मुंबई असा दहा-बारा तासांचा प्रवास मुंबई पोर्टवर जपण्यासाठी करावा लागत राहिला. आता जयगड बंदर झाल्यामुळे केवळ तीन तासात बंदरात ट्रक पोहोचू शकतो. 

जयगड येथील समुद्र नैसर्गिकरीत्या खूप खोल आहे. त्यामुळे तेथे मोठी जहाजे थांबू शकतात. आता आंग्रे पोर्टवर ४५ ते ५० हजार मेट्रिक टन माल वाहतूक करू शकतील इतका मोठ्या क्षमतेच्या बोटी थांबू शकतात. तेथे खूप मोठ्या क्षेत्रात गोदामे आहेत. याशिवाय कोल्हापूर, सांगली, बेळगाव ते जयगड हा प्रवास साधारण चार तासांचा आहे. रस्ते चांगले आहेत. हातखंबा ते जयगड बंदर हा साधारण ४५ किलोमीटरचा रस्ता नव्याने केला आहे. त्यावरील पूर्वीचे अडथळे काढले गेले आहेत.

पूर्वी जयगड, देवगड, हर्णे, दाभोळ रत्नागिरी, नागोठाणे ही बंदरे खूप महत्त्वाची होती. या बंदरांनी कोल्हापूरचा व्यापार परदेशात पोहोचवला होता. किंबहुना ही बंदरेच व्यापाराचा मोठा आधार होता. आता कोकण रेल्वेमुळेही खूप मोठ्या प्रमाणात जयगड बंदरात माल येणे सोयीचे झाले आहे. त्यामुळे कोल्हापूर हे समुद्र मार्गच्या व्यापाराचे, वाहतुकीचे प्रवेशद्वार (गेट वे) झाले आहे. केवळ साखरच नव्हे तर जिप्सम, कच्चे लोखंड, कोळसा, धान्य इतर साहित्यही या बंदारात निर्यात झाले आहे. 

साखर निर्यातीसाठी आंग्रे पोर्ट हा मोठा आधार आहे. मुंबईला नेण्याचा साखर वाहतूक खर्च व जयगडला नेण्याचा साखर वाहतूक खर्च यात फरक आहे. जयगड पोर्ट आपल्या परिसराला जवळचे आहे. त्यामुळे आंग्रे पोर्ट कोल्हापूर, सांगली, सातारा, बेळगाव परिसरासाठी अधिकाधिक सोयी देणारे आहे. 
- विशाल दिघे,
आंग्रे पोर्ट, कोल्हापूर शाखा

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

KKR vs SRH Live : सनरायझर्स हैदराबादचा इडन गार्डनवर दरारा! कोलकाता नाइट रायडर्सचा सलग दुसरा पराभव; गुणतालिकेत फेरबदल

Bharat Solanke : ‘स्टेअरिंग’ सोडलं अन् हातात घेतली लेखणी; ट्रकचालक भारत सोळंके यांचा ‘पीएचडी’पर्यंतचा थक्क प्रवास

IAS transfer: राज्यातील २५ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; रात्री उशिरा काढले आदेश

हनुमान जन्मोत्सवानिमित्त वानरांची शिस्तीत पंगत; वानरांना एका रांगेत बसवून केले अन्नदान

Pune CNG Price Hike: मोठी बातमी! पुण्यात 'सीएनजी'चे दर वाढले; मध्यरात्रीपासून नवा भाव लागू होणार

SCROLL FOR NEXT