कोकण

वेंगुर्ले नगरसेविका मारहाणीस राजकीय रंग चढल्याने तणाव

सकाळवृत्तसेवा

वेंगुर्ले - शहरात भाजप शिवसेना महिला नगरसेविकात झालेल्या मारहाण प्रकरणाला आता राजकीय रंग चढला आहे. आज भाजपचे जिल्हाध्यक्ष प्रमोद जठार व भाजप पदाधिकाऱ्यांनी शिवसेनेच्या महिला नगरसेविका सौ. सुमन निकम व स्वीकृत नगरसेवक संदेश निकम यांना घरात घुसून मारहाण केल्याचा आरोप निकम कुटुंबीयांनी केला. मारहाण करणाऱ्यांना अटक करण्याची मागणी करत शिवसेना कार्यकर्त्यांनी ठाण्यात ठिय्या मांडला. 

या प्रकरणाने शिवसेना-भाजप वाद चिघळला आहे. या पार्श्वभूमीवर शहरात निकम यांच्या घरी व भाजप-शिवसेना कार्यालय येथे पोलिस बंदोबस्त वाढवला आहे. भाजप जिल्हाध्यक्ष प्रमोद जठार व मारहाण करणाऱ्यांना अटक करण्याची मागणी करत शिवसेना पदाधिकाऱ्यांनी वेंगुर्ले पोलिस स्थानक येथे ठिय्या मांडला आहे.

आता पालकमंत्री दीपक केसरकर आपल्या मतदारसंघात कोणती भूमिका घेतात याकडे लक्ष लागले आहे. भाजप कार्यालयात आज दुपारी प्रमोद जठार यांच्या उपस्थितीत बैठक झाली. त्यानंतर निकम यांच्या घरी हा प्रकार घडल्याचा आरोप करण्यात आला. याचा उपविभागीय पोलिस अधिकारी शिवाजी मुळीक, वेंगुर्ले पोलिस निरीक्षक शशिकांत खोत अधिक तपास करीत आहे. मात्र, या घटनेने वेंगुर्ले शहरात हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे. दरम्यान, नगरसेविका श्रेया मयेकर गोवा येथे अधिक उपचार घेत आहेत तर आजच्या प्रकारानंतर नगरसेविका सुमन निकम सावंतवाडीत अधिक उपचार घेत आहेत. रात्री उशिरा सावंतवाडी डीवायएसपी कार्यालयात गुन्हा दाखल होण्याची शक्‍यता आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jalgaon Major Accident: भरधाव कारच्या धडकेत मजुरी करण्याऱ्या आईसह दोन चिमुकले ठार!

IPL 2024 DC vs RR : दिल्लीचा राजस्थानला दणका, घरच्या मैदानात मिळवला दणदणीत विजय; संजू सॅमसनचे अर्धशतक व्यर्थ

Virtual Touch: बालकांना 'व्हर्च्युअल स्पर्शा'च्या धोक्याची जाणीवही करुन देणं गरजेच - हायकोर्ट

Navneet Rana: "काँग्रेसला मत देणं म्हणजे थेट पाकिस्तानला मत देणं"; नवनीत राणांचं वादग्रस्त विधान

यवतमाळ जिल्हा कारागृहातील धक्कादायक घटना; कारागृहातील अधिकारी, कर्मचाऱ्यावर कैद्यांच्या टोळीचा हल्ला

SCROLL FOR NEXT