कोकण

रत्नागिरी : ....याचसाठी विश्‍वास सुर्वेंचा शिवसेनेला रामराम 

सकाळ वृत्तसेवा

चिपळूण - रत्नागिरी जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष विश्‍वास सुर्वे यांनी शिवसेनेच्या सदस्यत्वपदाचा राजीनामा दिला. पेढे - परशुराम मधील कुळांचा प्रश्‍न मला शिवसेनेच्या माध्यमातून सोडवता आला नाही म्हणून मी सेना सोडत असल्याची माहिती विश्वास सुर्वे यांनी पत्रकार परिषदेत दिली. 

श्री. सुर्वे म्हणाले, मी गेली वीस वर्ष पेढे जिल्हा परिषद गटात शिवसेनेच्या माध्यमातून सक्रीय होतो. पेढे गावचा सरपंच झालो. रत्नागिरी जिल्हा परिषदेत सदस्य म्हणून निवडून गेलो. जिल्हा परिषदेच्या उपाध्यक्षपदाची संधी मिळाली. संघटनेचा विभागप्रमुख होण्याचे भाग्य लाभले. मात्र 20 वर्षात माझ्यावर अनेक प्रकारचे अन्याय झाले. सामान्य शिवसैनिक म्हणून ते सर्व आरोप सहन केले. आजही शिवसेना सोडायची इच्छा नव्हती. परंतू माझ्या विभागातील प्रश्‍नांकडे आमदार सदानंद चव्हाण यांच्याकडून दहा वर्ष दुलर्क्ष झाले. या निवडणूकीत मी कोणत्या तोंडाने चव्हाण यांच्यासाठी मते मागायला मतदारांकडे जाऊ अशा प्रश्‍न माझ्यासमोर आहे.

पेढे, परशुराममधील शेकडो शेतकर्‍यांची जमीन 1985 मध्ये एमआयडीसीला गेली. 1992 मध्ये कोकण रेल्वेला गेली. 2005 मध्ये शेतकर्‍यांचे लाखोचे नुकसान झाले. मुंबई - गोवा राष्ट्रीय महामार्गाला पूर्वी गावातील जमिन संपादीत झाली आहेत. त्याशिवाय नव्याने होणार्‍या चौपदरीकरणासाठी शेकडो एकर संपादित झाली आहे. पण शेतकर्‍यांच्या संपादित जमिनीचा मोबदला अद्याप मिळालेला नाही.

- विश्वास सुर्वे

पेढे - परशुराम गावातील खोत आणि कुळ यांच्यातील वादामुळे हा प्रश्‍न गेली अनेक वर्ष रखडलेला आहे. स्थानिक आमदार, खासदार, विरोधी पक्षातील नेत्यांकडे पाठपुरावा केल्यानंतरही कोणी आमचा प्रश्‍न सोडवला नाही. त्यामुळे मी शिवसेना सोडण्याचा निर्णय घेतला आहे. योग्य वाटेल त्या उमेदवाराला मी मतदान करेन. तुर्तास इतर कोणत्याही पक्षात जाणार नाही. मतदारांना जो उमेदवार योग्य वाटेल त्याला ते मतदान करतील. असे श्री. सुर्वे यांनी सांगितले. 

मुंबई - गोवा राष्ट्रीय महामार्गात संपादित होणार्‍या जमिनीचा मोबदला मिळावा. यासाठी मी तीन वर्ष पाठपुरावा करत होतो. लोकसभा निवडणूकीत बहिष्कार टाकण्याचा निर्णय ग्रामस्थांनी घेतला होता. तरीही लोकांना शिवसेनेबद्दल सहानुभूती होती म्हणून गावातील सेनेला मतदान झाले. त्यानंतर सेनेचे पदाधिकारी किंवा लोकप्रतिनिधी आभार मानण्यासाठी सुद्धा गावात आले नाही. याचे दुःख वाटले. असे श्री. सुर्वे यांनी सांगितले. 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Uddhav Thackeray: ठाकरेंकडून INDIA आघाडीच्या पंतप्रधानांच्या शपथविधीचं मोदींना निमंत्रण; म्हणाले, खुर्चीवर आहे तोपर्यंत...

Virat Kohli : विराट कोहली बीसीसीआयवर झाला नाराज; हा नियम रद्द करण्याची केली मागणी

Viral Video: संसदेमध्ये असला राडा कधीच पाहिला नसेल! सभागृहात खासदारांमध्ये तुफान हाणामारी, पाहा व्हिडिओ

Nashik Crime News : रेल्वे कर्मचाऱ्याकडूनच पानेवाडीत इंधनाची चोरी; 6 जण ताब्यात

Latest Marathi News Live Update : बिभव कुमार यांच्या अटकपूर्व जामीन प्रकरणाचा निर्णय कोर्टाने राखून ठेवला

SCROLL FOR NEXT