कोकण

सिंधुदुर्गात धरणांच्या पातळीत कमालीची घट 

सकाळवृत्तसेवा

कणकवली - वाढत्या उष्म्यामुळे जिल्ह्यातील मध्यम आणि लघु पाटबंधारे धरणाच्या पातळीत कमालीची घट होत आहे. आतापर्यंतचा उपयुक्त पाणीसाठा 25 टक्‍क्‍यांवर आहे. त्यामुळे जूनच्या पहिला आठवड्यात पाऊस झाला तर ठीक अन्यथा दुष्काळी परिस्थिती ओढावेल, अशी भीती शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे. 

तापमान दिवसेंदिवस वाढत असल्याने उन्हाळी शेतीला पाणी अपुरे पडू लागले आहे. जिल्ह्यातील कोर्ले, सातंडी पाटबंधारे प्रकल्पात सध्याचा उपयुक्त साठा 25 टक्के आहे. गतवर्षी हा साठा या काळात 23 टक्‍क्‍यांवर होता.

लघु पाटबंधारेच्या शिवडाव धरणात आजचा उपयुक्त साठा 2.6 दशलक्ष घनमीटर, नाधवडे 4.36 दशलक्ष घनमीटर, ओटव 4.68 दशलक्ष घनमीटर, देदोनवाडी 9.80 दशलक्ष घनमीटर आणि तरंदळे 4.55 दशलक्ष घनमीटर इतका आहे. कुर्ली घोणसरी धरण प्रकल्प साठा 40 टकक्‍यांवर आला आहे. विहिरी, नदी-नाल्यांची पाणीपातळी घटली आहे. गावातील नळ पाणी पुरवठा योजनांचे वेळापत्रकही बदलले आहे. उन्हाळी शेती अंतिम टप्प्यात असली तरी पाण्याचा तुटवडा असल्याने चिंता व्यक्त होत आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai News: 'डायल 108' अ‍ॅम्ब्युलन्स प्रोजेक्ट कंत्राट प्रकरण तापणार? हायकोर्टाकडून राज्य सरकारला नोटीस

Pat Cummins: कमिन्सनं सांगितलं कसं तुटलेलं त्याचं बोट... ऐकून हार्दिक अन् सूर्याही झाले शॉक; Video व्हायरल

Latest Marathi News Live Update : 'तीन टप्प्यांनंतर हे स्पष्ट झालंय की भाजपचा विजय रथ जनता पुढे नेतेय..' - पंतप्रधान मोदी

Wedding Season : नोंदणी पद्धतीने विवाह करायचा आहे? मग, जाणून घ्या सोपी प्रक्रिया

18 आमदारांची प्रतिष्ठा लागली पणाला; नेत्यांच्या कामगिरीवरच लोकसभेच्या उमेदवारांचं भवितव्य अवलंबून!

SCROLL FOR NEXT