without practice 14 marathon complete a suyash in ratnagiri
without practice 14 marathon complete a suyash in ratnagiri 
कोकण

मॅरेथॉनसाठी सुयश स्वत:चाच बनला मार्गदर्शक ; १६ शर्यती केल्या पूर्ण!

सकाळ वृत्तसेवा

गुहागर : हॉटेल मॅनेजमेंटचे शिक्षण घेताना वेगळं काहीतरी करावं, म्हणून तो धावू लागला. सरावाच्या वेळी अचानक पुण्यातील एका अर्ध मॅरेथॉनमध्ये भाग घेण्याची संधी मिळाली. आत्मविश्वास वाढला आणि गेल्या तीन वर्षांत प्रशिक्षक, मार्गदर्शकाविना १६ शर्यती पूर्ण केल्या. या स्पर्धांत भाग घेताना क्षमता कशी टिकवायची, संतुलित आहार कोणता घ्यावा, प्रत्यक्ष धावताना ऊर्जा येण्यासाठी आपण कधी व किती प्रमाणात ऊर्जा देणारे पेय घ्यावे, आदी गोष्टी तो स्वत:च शिकला. या खेळाडूचे नाव आहे सुमित कांबळे. 

गुहागर हायस्कूलमधील शिक्षक, गृहरक्षक दलाचे तालुका समन्वयक सुधाकर कांबळे यांचा तो मुलगा. माध्यमिक शिक्षण झाल्यावर सुमित लोणावळा येथे हॉटेल मॅनेजमेंट शिकण्यासाठी गेला. तेथे तंदुरुस्तीसाठी त्याने धावण्याचा व्यायाम निवडला. सुरवातीला महाविद्यालयाच्या मैदानावर धावताना त्याला धावण्याचा छंद लागला. लोणावळ्यातील अनेक घाट रस्त्यांवर सुमित धावत असे. याच दरम्यान त्याने पुण्यातील अर्ध मॅरेथॉन पूर्ण केली. 

गेल्या तीन वर्षात ८ अर्ध मॅरेथॉन (२१ कि.मी.), ४ पूर्ण मॅरेथॉन (४२ कि.मी.) आणि ३ अल्ट्रा मॅरेथॉन (५० कि.मी.) त्याने पूर्ण केल्या. नुकतीच त्याने सर्वाधिक ५३ कि.मी.ची अल्ट्रा मॅरेथॉनही पूर्ण केली. आता मॅरेथॉनच्या वर्तुळात त्याला अल्ट्रा रनर म्हणून ओळखले जाऊ लागले आहे. याबाबत सुमित म्हणतो की, मॅरेथॉन धावणाऱ्या खेळाडूला ट्रॅक, त्यामधील चढ उतार, चालणे धावण्याची योजना, शरीर आणि उर्जेचा समतोल आदी गोष्टींचा विचार करावा लागतो. 


१०० दिवसांत धावला ७६३ किलोमीटर..!

लॉकडाउनच्या काळात एका संस्थेने १०० दिवस दररोज किमान ३ कि.मी. धावण्याची स्पर्धा ठेवली होती. देशातून ५,७९४ स्पर्धक सहभागी झाले होते. सुमितने कोकणातल्या मुसळधार पावसात १०० दिवसांत ७६३ कि.मी. धावून देशात २२२ वी, तर महाराष्ट्रात ५८ वी रॅंक प्राप्त केली.

संपादन - स्नेहल कदम 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sharad Pawar: "अरे मामा जरा जपून... तुझं सर्व काढायला वेळ लागणार नाही"; इंदापुरात शरद पवारांचा इशारा!

IPL 2024 PBKS vs CSK Live Score : अर्शदीपचा अप्रतिम यॉर्कर अन् रहाणे झाला बाद

Lok Sabha : 'एक भाकरी, एक रूपया द्या.. एका भिक्षुकाला पंतप्रधान करा' म्हणणाऱ्या विजयप्रकाश कोंडेकरांकडे किती आहे संपत्ती?

Latest Marathi News Live Update : राहुल गांधी यांनी वायनाडच्या लोकांशी केलेली फसवणूक - गौरव वल्लभ

South India Travel : उन्हाळ्यातही करू शकता दक्षिण भारताची सफर; जाणून घ्या 'ही' थंड हवेची ठिकाणं

SCROLL FOR NEXT