कोकण

#WorldTourismDay झुलत्या पुलाचे स्वप्न अधांतरी

दीपेश परब

वेंगुर्ले - कोकणातील पहिला आकर्षक झुलता पूल येथे उभारण्याचे स्वप्न अद्याप धुसरच आहे. पर्यटनाच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचे असलेले हे झुलते पूल येथे झाल्यास वेंगुर्लेच्या वैभवात अधिकच भर पडणार आहे. हा प्रकल्प गेली ३ वर्षे रखडला आहे.

पालकमंत्री दीपक केसरकर यांच्या माध्यमातून हरिद्वार, ऋषिकेशच्या धर्तीवर कोकण विभागातील पहिला झुलता पादचारी पूल नावबाग येथे मंजूर झाला. अतिशय शांत असा समुद्रकिनारा लाभलेले सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वेंगुर्ले हे प्रसिद्ध पर्यटन स्थळ आहे. देश-विदेशी पर्यटकांना बंदर पाहून झाल्यानंतर तीन-चार किलोमीटर वळसा घालून नावबाग व उभादांडा सागरेश्वर येथील बीचवर जावे लागते. यामुळेच सुमारे सात वर्षांपूर्वी नावबाग बीच येथे आयोजित करण्यात आलेल्या राज्यस्तरीय बीच कबड्डी स्पर्धेवेळी पालकमंत्री केसरकर नावबाग व वेंगुर्ले बंदरला जोडणारा झुलता पादचारी पूल जोडण्यात येईल असे जाहीर केले होते.

या झुलत्या पुलासाठी २०११ मध्ये ६८ लाख २४ हजार एवढ्या रकमेस प्रशासकीय मान्यता मिळाली होती. त्यानंतर महाराष्ट्र कोस्टल मॅनेजमेंट ॲथॉरिटी मुंबई यांच्याकडे या पुलासाठी सी आर झेडची मान्यताप्राप्त झाल्यानंतर २ कोटी ३७ लाख ७५ हजारांच्या अंदाजपत्रकास मंजुरी देण्यात आली व महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाकडून १ कोटी ६७ लाख ७५ हजार व जिल्हा नियोजन समितीकडून ७० लाख मंजूर करण्यात आले.

पुलाच्या बांधकामाचा ठेका मे. इनोव्हेटिव्ह कॉन्ट्राव्हेंच्युअर्स ठाणे यांना देण्यात आला. सप्टेंबर २०१६ मध्ये ठेकेदाराने प्रत्यक्ष कामास सुरुवात केली; मात्र पुलाच्या कामाची आखणी सुरू असतानाच स्थानिक मच्छिमारांनी पुलाचे गाळे नौकानयनाच्या दृष्टिकोनातून अधिक लांबीचे ठेवण्याची मागणी करत या कामाला विरोध केला. त्यामुळे हे काम रखडले. पुढे पालकमंत्री व जिल्हाधिकारी यांच्या बैठकीत पुलाचे गाळे वाढवण्यास मंजुरी देण्यात आली. मात्र, तरीही या पुलाचे काम रखडलेल्या स्थितीतच आहे.

कामाला मुहूर्त केव्हा?
झुलत्या पुलाचे काम अतिशय आकर्षक व लक्ष्मण झुल्याप्रमाणेच व्हावे, यासाठी हे काम केरळ येथील एका मोठ्या कंपनीला देण्यात येईल, असे पालकमंत्री केसरकर यांनी सांगितले होते. मात्र, अद्यापपर्यंत हे काम तसेच रखडलेले आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gautam Gambhir: 'KKR जिंकल्यावर गंभीरचे कौतुक अन् हरल्यावर श्रेयसची चूक?' दिग्गज क्रिकेटरच्या पोस्टने उडवली खळबळ

Radhika Kheda: "मला मद्य पिण्याची ऑफर दिली अन् कार्यकर्ते..."; राधिका खेरांचा काँग्रेसच्या भारत जोडो यात्रेवर गंभीर आरोप

Artificial Intelligence in Business: चक्क ९४ टक्के भारतीय प्रोफेशनल्स करतात कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर, काय आहे कारण ?

The Family Man 3: प्रेक्षकांसाठी खुशखबर! 'द फॅमिली मॅन 3'बद्दल मनोज बाजपेयींनी दिली मोठी अपडेट

Lok Sabha 2024: मतदान केंद्रांना नायलॉनच्या जाळ्यांचे कवच, 101 वाघ असलेल्या जंगलात असं पार पडणार वोटींग

SCROLL FOR NEXT