worldcup
worldcup 
क्रीडा

2011च्या विश्वविजेत्या संघातील खेळाडूने मॅच फिक्सिंग केल्याचा संशय

वृत्तसंस्था

जयपूर - भारतीय क्रिकेट पुन्हा एकदा फिक्सिंगच्या चक्रात अडकणार का? असा प्रश्न सध्या निर्माण झाला आहे. स्थानिक पातळीवर आयोजित करण्यात येणाऱ्या राजपुताना टी-20 लीगमध्ये (आरपीएल) फिक्सिंग केल्याच्या आरोपावरुन, 20111च्या विश्वविजेत्या संघातील एका खेळाडूची चौकशी केली जाण्याची शक्यता आहे. इंडियन एक्स्प्रेस'ने या संदर्भातील वृत्त दिले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार माहितीनुसार, आरपीएल ही स्पर्धा गेल्या वर्षापासून बीसीसीआयच्या भ्रष्टाचार विरोधी पथकाच्या नजरेत होती. सध्या राजस्थान पोलिसांचा सीआयडी विभाग या लीगच्या आयोजकांची सखोल चौकशी करत आहेत. पोलिसांना या लीगमधून फिक्सिंग करण्याचा प्रयत्न करणाऱ्या मुख्य सुत्रधाराची ओळख पटली आहे. या सुत्रधाराचे भारताकडून आंतरराष्ट्रीय पातळीवर क्रिकेट खेळलेल्या खेळाडूशी संबंध असल्याची शक्यता वर्तविली जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार भारताकडून वन-डे, कसोटी आणि टी-२० या तिन्ही प्रकारात क्रिकेट खेळलेला हा खेळाडू या स्पर्धेतील काही सामन्यांमध्ये हजर होता. निओ स्पोर्ट्सने या स्पर्धेचे थेट प्रक्षेपण केले होते. 

या लीगमधील अंतिम सामन्यात एका गोलंदाजाने चक्क 8 वाईड बॉल टाकल्यानंतर, बीसीसीआयला राजपुताना प्रिमीअर लीगच्या आयोजनाबद्दल संशय आला होता. यानंतर भ्रष्टाचारा विरोधी पथकाच्या सल्ल्यानंतर बीसीसीआयने राजस्थान पोलिसांना या क्रिकेट स्पर्धेची चौकशी करण्याची विनंती केली होती. यानंतर राजस्थान पोलिसांनी जयपूरमधील 4 हॉटेलवर छापा टाकत 14 जणांना ताब्यात घेतले. या 14 संशयितांनी राजपुताना प्रिमीअर लीगच्या आयोजक, खेळाडू, पंचांशी संपर्क साधल्याचे समोर आले. याचसोबत पोलिसांनी केलेल्या छापेमारीत रोखरक्कम, मोबाईल फोन, वॉकी-टॉकी, लॅपटॉप असा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. दरम्यान, याप्रकरणी अटक केलेले आरोपी सध्या जामीनावर असून, हे प्रकरण राजस्थान पोलिसांच्या सीआयडी विभागाकडे आहे.

पोलिस या प्रकरणाची चौकशी करत असून, दोषी व्यक्तींवर योग्य ती कारवाई करण्यात येईल असं आश्वासन राजस्थान पोलिसांच्या सीआयडी विभागाचे अतिरीक्त महासंचालक पंकज कुमार सिंह यांनी म्हटलं आहे. मात्र विश्वचषक विजेत्या भारतीय संघातील खेळाडूच्या सहभागाबद्दल कोणतीही माहिती देण्यासाठी नकार दिला आहे. त्यामुळे राजस्थान पोलिस या प्रकरणी नेमकी काय कारवाई करतात, हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

KKR vs DC : दिल्ली पॉईंट टेबलमध्ये मोठी उसळी घेणार की जेक फ्रेसर मॅर्कगर्कला केकेआर रोखणार?

CSK vs SRH IPL 2024 : चेन्नईनं पुन्हा जिंकला चेपॉकचा गड; हैदराबादची इतिहासातील सर्वात मोठी हार

Sambhajinagar : राज्यातील पहिल्या मोसंबी ग्रेडींग व्हॅक्सीन व कोल्ड स्टोरेज केंद्राचे काम पूर्णत्वाकडे

Share Market : शेअर बाजारातील किरकोळ गुंतवणूकदारांच्या संखेत वर्षात ४.०३ कोटींची वाढ; देशात 'हे' राज्य आघाडीवर

Pune Traffic Updates : पुणे विद्यापीठ चौकातील मेट्रोच्या कामानिमित्त वाहतुकीत बदल

SCROLL FOR NEXT