Ajinkya Rahane
Ajinkya Rahane Sakal
क्रीडा

VIDEO : 'बचपन की यादें' रहाणे डोंबिवलीतील शाळेत गेला; अन्....

सकाळ डिजिटल टीम

मुंबई : भारतीय संघाचा अनुभवी खेळाडू अजिंक्य रहाणे (Ajinkya Rahane) सध्या संघर्षाचा सामना करत आहे. कामगिरीतील सातत्य कायम ठेवण्यात अपयशी ठरल्याने त्याला संघाबाहेरचा रस्ता दाखवण्यात आलाये. एवढेच नाही तर बीसीसीआयने (BCCI ) त्याला अ श्रेणीतून ब श्रेणीत टाकले आहे. रणजी सामन्यात स्वत:ला सिद्ध करण्याची धडपड करत असलेल्या रहाणेला आपल्या कठिण प्रसंगात ज्ञानाचे मंदीर आठवल्याचे दिसते. रहाणेनं नुकतीच आपल्या शाळेला भेट दिली. त्याच्यासोबत मुलगी आणि पत्नी देखील होती. या भेटीची गोष्ट त्याने खास व्हिडिओच्या माध्यमातून शेअर केलीये.

अजिंक्य रहाणेनं डोंबिवलीतील आपल्या शाळेला भेट देत जुन्या आठवणीला उजाळा दिलाय. 33 वर्षीय अजिंक्य रहाणेनं डोंबिवलीतील 'एस व्ही जोशी माध्यमिक विद्यालयाला भेट दिली. याच ठिकाणी त्याने शिक्षण घेतले होते. काळानुसार ही जागा बदलली असली तरी या जागेबद्दलच्या भावना त्याच आहेत. इथं आल्यानंतर जमीनीशी जोडले आहोत, ही गोष्ट जाणवते, अशा अशी भावना अजिंक्य रहाणेनं व्यक्त केली आहे. त्याने शाळेबद्दलची आपुलकीच दाखवून दिलीये.

मागील वर्षी भारतीय संघाने ऑस्ट्रेलियाच्या मैदानात ऐतिहासिक कामगिरी करुन दाखवली होती. यावेळी विराट कोहलीच्या अनुपस्थितीत अजिंक्य रहाणेनंच भारतीय कसोटी संघाचे नेतृत्व केले होते. पण काही दिवसांपासून त्याच्या भात्यातून धावा होताना दिसत नाही. खराब कामगिरीमुळे त्याने टीम इंडियातील जागा गमावली आहे. रणजी ट्रॉफी स्पर्धेत त्याने सौराष्ट्र विरुद्ध शतकी कामगिरी केली होती. आता इंडियन प्रीमियर लीगमध्ये तो कोलकाता नाईट रायडर्सच्या संघातून खेळताना दिसणार आहे.

काही दिवसांपूर्वीच बीसीसीआयने 2021-22 या वर्षासाठी करार यादी जाहीर केली होती. गेल्या काही दिवसांपासून खराब कामगिरी करणाऱ्या अजिंक्य रहाणे आणि चेतेश्वर पुजाराला अ श्रेणीतून ब श्रेणीत टाकण्यात आले. एवढेच नाही तर लंकेविरुद्धच्या कसोटी मालिकेतूनही दोघांना वगळण्यात आले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Lok Sabha Election 2024 Phase 3 LIVE Updates : सुप्रिया सुळे अजित पवारांच्या घरी दाखल

EVM वर कमळाचं फुलं दिसत नसल्याने आजोबा संतापले...बारामती मतदारसंघात नेमकं काय घडलं?

Session Court : लैंगिक छळ प्रकरणात माजी पंतप्रधान आणि माजी मुख्यमंत्र्यांचे नाव वापरण्यास बंदी; न्यायालयाचा आदेश जारी

Rohit Sharma : 6,8,4,11 आणि 4... वर्ल्ड कपच्या तोंडावर रोहितला झालं तरी काय? BCCI अन् चाहते टेन्शनमध्ये

Lok Sabha Voting 3rd Phase : महाराष्ट्रात सकाळी नऊ वाजेपर्यंत सर्वात कमी मतदान; पश्चिम बंगालमध्ये सर्वाधिक मतदानाची नोंद

SCROLL FOR NEXT