PV Sindhu
PV Sindhu esakal
क्रीडा

Asia Badminton Competition : भारतीय पुरुष बॅडमिंटन संघ इतिहास रचणार? पी. व्ही. सिंधूचे होणार पुनरागमन

सकाळ वृत्तसेवा

शाह आलम (मलेशिया) - आशियाई बॅडमिंटन सांघिक अजिंक्यपद स्पर्धेला उद्यापासून (ता. १३) मलेशियातील शाह आलम येथे सुरुवात होणार आहे. भारताच्या पुरुष संघाला या स्पर्धेच्या अजिंक्यपदावर अद्याप एकदाही मोहोर उमटवता आलेली नाही. दोन वेळा ब्राँझपदक पटकावणाऱ्या भारतीय पुरुष संघाकडून यंदा सुवर्णपदकाची आशा बाळगता येणार आहे.

त्यामुळे या संघातील बॅडमिंटनपटूंच्या कामगिरीवर सर्वांच्या नजरा खिळलेल्या असतील. पुरुष संघ इतिहास रचतो का, हे पाहणे रंजक ठरणार आहे. महिला संघात पी. व्ही. सिंधूचे पुनरागमन होणार असून दुखापतीवर मात करीत बॅडमिंटन कोर्टवर परतणारी फुलराणी कसा खेळ करतेय हे पाहणेदेखील औत्सुक्याचे ठरणार आहे. ही स्पर्धा पॅरिस ऑलिंपिक पात्रतेसाठी महत्त्वाची असल्यामुळे बॅडमिंटनपटूंचा कस लागणार आहे.

भारताच्या पुरुष बॅडमिंटन संघाने २०२२मध्ये थॉमस करंडक जिंकण्याची किमया करून दाखवली. त्यानंतर मागील वर्षी आशियाई क्रीडा स्पर्धेमध्ये पहिल्यांदाच रौप्यपदक जिंकताना उल्लेखनीय कामगिरी केली. याआधी २०१६ व २०१८ च्या आशियाई बॅडमिंटन सांघिक अजिंक्यपद स्पर्धेमध्ये भारताच्या पुरुष संघाने ब्राँझपदकाची कमाई केली आहे. भारताच्या पुरुष बॅडमिंटन संघाने गेल्या काही वर्षांमध्ये प्रगतीच्या दिशेने पाऊल टाकले आहे. त्यामुळे आशियाई बॅडमिंटन सांघिक अजिंक्यपद स्पर्धेतही या संघाकडून मोठी अपेक्षा केली जात आहे.

भारताचा पुरुष बॅडमिंटन संघ अ गटामध्ये असून त्यामध्ये चीन व हाँगकाँग या दोन देशांचाही समावेश आहे. या गटातून दोन देशांना बाद फेरीत प्रवेश करता येणार आहे. भारतीय पुरुष संघाची मदार एच.एस.प्रणोय, लक्ष्य सेन यांच्यासह सात्विक साईराज रंकीरेड्डी - चिराग शेट्टी या जोडीवर असणार आहे.

युवा महिला खेळाडूंकडून आशा

पी. व्ही. सिंधू, ट्रीसा जॉली - गायत्री गोपीचंद, अश्‍विनी पोन्नाप्पा - तनिशा क्रॅस्टो या खेळाडूंच्या कामगिरीवर भारतीय महिला संघाचे भवितव्य अवलंबून असले तरी या संघात युवा खेळाडूंनाही संधी देण्यात आली आहे. त्यामध्ये अश्‍मिता छलीहा, अनमोल खर्ब, तन्वी शर्मा या खेळाडूंना भारतासाठी खेळताना मोलाची कामगिरी करावी लागणार आहे.

सलामीची लढत हाँगकाँगशी

भारतीय पुरुष बॅडमिंटन संघाचा सलामीचा सामना हाँगकाँगशी होणार आहे. भारतीय पुरुष संघासमोर तुलनेने कमकुवत आव्हान असणार आहे. एनजी का लाँग अँगस याच्याकडून हाँगकाँगला विजयाची आशा असेल. मात्र हाँगकाँग संघातील इतर खेळाडू भारतीयांवर वरचढ होतील असे चित्र दिसून येत नाही.

महिलांसमोर चीनचे तगडे आव्हान

भारतीय महिला बॅडमिंटन संघासमोर मात्र चीनचे तगडे आव्हान असणार आहे. डब्ल्यू गटामध्ये भारत व चीन या दोन देशांचा समावेश आहे. दोनही संघाचा बाद फेरीतील प्रवेश निश्‍चित असणार आहे. चीनच्या महिला संघात हॅन युई, वँग यी, झँग यी या स्टार खेळाडूंचा समावेश आहे. तसेच दुहेरीत लिऊ शू व टॅन निंग या जोडीकडूनही कडवा संघर्ष मिळू शकतो.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

'शरद पवारांनी भाजपला पाठिंबा दिला होता, ती जर सुपारी होती तर आमचीही..'; आव्हाड, राऊतांच्या टीकेला मनसे आमदाराचं प्रत्युत्तर

Maharashtra Lok Sabha 2024 Phase 5 Election Voting LIVE : Lok Sabha Election 2024 : जाणून घ्या 6 वाजेपर्यंत महाराष्ट्रातील मतदानाची टक्केवारी

Lok Sabha Election 2024 : मतदान केंद्रावरील निवडणूक आयोगाने दिलेल्या सुविधांचा मतदारांना दिलासा

Latest Marathi Live News Update : कंगना रणौत यांच्या रॅलीवर दगडफेक; काँग्रेसविरोधात निवडणूक आयोगाकडे भाजपची तक्रार

Devendra Fadanvis: 'उद्धव ठाकरेंचं रडगाणं सुरू, पराभव समोर दिसू लागल्यानेच त्यांची मोदींवर टीका'; देवेंद्र फडणवीसांचा आरोप

SCROLL FOR NEXT