Asia Cup 2022 Full Schedule : येत्या 27 ऑगस्टपासून सुरू होणाऱ्या पुरूष आशिया कप क्रिकेट स्पर्धेला सुरूवात होणार आहे. या स्पर्धेचे संपूर्ण वेळापत्रक नुकतेच जय शहा यांनी जाहीर केले. 15 वी आशिया कप क्रिकेट स्पर्धा 27 ऑगस्ट ते 11 सप्टेंबर या दरम्यान होणार आहे. या स्पर्धेसाठी दोन ग्रुप करण्यात आले आहेत. ग्रुप 'अ' मध्ये भारत आणि पाकिस्तान (India Vs Pakistan) या पारंपरिक प्रतिस्पर्ध्यांचा समावेश आहे. या ग्रुपमधील तिसरा संघ हा पात्रता फेरीतून येणार आहे. तर ग्रुप 'ब' मध्ये श्रीलंका, बांगलादेश आणि अफगाणिस्तान यांचा समावेश आहे.
भारत आणि पाकिस्तान हे ग्रुप 'अ' च्या पहिल्याच सामन्यात 28 ऑगस्टला एकमेकांना भिडणार आहे. ग्रुपमधील संघ पाहिले तर भारत पाकिस्तान हे त्यानंतर सुपर 4 मध्ये देखील भिडण्याची शक्यता आहे. यंदाच्या आशिया कपचे आयोजन हे संयुक्त अरब अमिरातीमध्ये होणार आहे. श्रीलंकेतील आर्थिक संकट पाहता श्रीलंकेने यजामनपद भुषवण्यास नकार दिला होता. गेल्या पाच वर्षात युएई दुसऱ्यांदा आशिया कपचे आयोजन करणार आहे. यापूर्वी त्यांनी 2018 मध्ये वनडे फॉरमॅटने खेळवण्यात आलेल्या आशिया कपचे आयोजन केले होते.
भारतीय संघ पहिल्याच सामन्यात पाकिस्तानचा वचपा काढण्यासाठी जोर लावेल. दुबईतच पाकिस्तानने टी 20 वर्ल्डकप सामन्यात भारताचा इतिहासात पहिल्यांदाच पराभव केला होता. यंदाचा आशिया कप हा टी 20 फॉरमॅटमध्ये होणार आहे.
आशिया कप संपूर्ण वेळापत्रक (Asia Cup Schedule)
27 ऑगस्ट - श्रीलंका विरूद्ध अफगाणिस्तान - दुबई
28 ऑगस्ट - भारत विरूद्ध पाकिस्तान - दुबई
30 ऑगस्ट - बांगलादेश विरूद्ध अफगाणिस्तान - शारजाह
31 ऑगस्ट - भारत विरूद्ध पात्रता फेरी पार करणार संघ - दुबई
1 सप्टेंबर - श्रीलंका विरूद्ध बांगलादेश - दुबई
2 सप्टेंबर - पाकिस्तान विरूद्ध पात्रता फेरी पार करणार संघ - शारजाह
3 सप्टेंबर - ब गटातील क्रमांक 1 विरूद्ध ब गटातील क्रमांक 2 - शारजाह
4 सप्टेंबर - अ गटातील क्रमांक 1 विरूद्ध अ गटातील क्रमांक 2 - दुबई
6 सप्टेंबर - अ गटातील क्रमांक 2 विरूद्ध ब गटातील क्रमांक 2 - दुबई
7 सप्टेंबर - अ गटातील क्रमांक 1 विरूद्ध ब गटातील क्रमांक 2 - दुबई
8 सप्टेंबर - अ गटातील क्रमांक 1 विरूद्ध ब गटातील क्रमांक 2 - दुबई
9 सप्टेंबर - ब गटातील क्रमांक 1 विरूद्ध अ गटातील क्रमांक 2 - दुबई
11 सप्टेंबर - अंतिम सामना
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.