BCCI Comes Under NADA Ambit Indian Players To Be Tested By NADA
BCCI Comes Under NADA Ambit Indian Players To Be Tested By NADA 
क्रीडा

भारतीयांची उत्तेजक चाचणी कधीही, कोठेही; बीसीसीआय नाडाला शरण

वृत्तसंस्था

नवी दिल्ली : अनेक वर्षांपासून उत्तेजक सेवन चाचणीच्या बंधनापासून दूर राहणाऱ्या भारतीय क्रिकेट मंडळाने (बीसीसीआय) शुक्रवारी अखेर राष्ट्रीय उत्तेजक विरोधी संस्थेची (नाडा) बंधने स्विकारली. त्यामुळे आजपासून आर्थिकदृष्ट्या स्वायत्त असूनही "बीसीसीआय' राष्ट्रीय क्रीडा महासंघ म्हणून ओळखले जाईल. 

उत्तेजक सेवन चाचणीपासून सातत्याने दूर पळत राहिल्याने आगामी काही महिन्यात भारताचा दौरा करणाऱ्या परदेशी संघांसाठी मान्यता प्रमाणपत्र रोखून क्रीडा मंत्रालयाने "बीसीसीआय'ला कोंडीत पकडले होते. या पार्श्‍वभूमीर "बीसीसीआय'चे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल जोहरी, क्रिकेट व्यवस्थापक साबा करिम यांनी आज क्रीडा सचिव राधेश्‍याम झुलानिया, तसेच "नाडा'चे महाव्यवस्थापक नविन अगरवाल यांची भेट घेतली. या बैठकी दरम्यान "बीसीसीआय'ने "नाडा'च्या सर्व अटी मान्य करून त्यांची उत्तेजक विरोधी योजनेचे भाग राहू असे लिहून दिले. यामुळे आता सर्व क्रिकेटपटूंची "नाडा'च्या वतीने उत्तेजक चाचणी घेण्यात येईल. 

येथे सह्या कुणी करायला सांगितला हा प्रश्‍न नाही. कायदा आहे म्हणजे तो पाळावा लागणार. तो केव्हा आणि कधी पाळायचा हे आपण ठरवू शकत नाही. 
-राहुल जोहरी, "बीसीसीआय'चे मुख्य कार्यकारी अधिकारी 

आर्थिकदृष्ट्या स्वायत्त म्हणून लौकिक असणाऱ्या "बीसीसीआय'ची ही सर्वांत मोठी घडामोड आहे. प्रथमच त्यांना कुणाच्या अधिपत्याखाली रहावे लागणार आहे. राष्ट्रीय क्रीडा महासंघ म्हणून त्यांची ओळख होणार आहे. "नाडा'च्या अधिपत्याखाली आल्यावर "बीसीसीआय'वर आता माहिती अधिकाराखाली येण्याचे दडपण वाढणार आहे. 

सशुल्क सुविधा 
बैठकी दरम्यान बीसीसीआयने क्रीडा मंत्रालय आणि नाडाच्या पदाधिकाऱ्यांसमोर चाचणीची साधने, प्रयोगशाळांची क्षमता आणि नमुने घेण्याची पद्धत सर्वोच्च दर्जाच्या असाव्यात अशी मागणी केली. त्या वेळी क्रीडा मंत्रालय आणि "नाडा' यांच्याकडून ज्या काही सोयी सुविधा बीसीसीआयला आवश्‍यक असतील, त्या पुरविल्या जातील. पण, त्यासाठी काही शुल्क आकारले जाईल, असे सांगण्यात आले. झुलानिया म्हणाले,"बीसीसीआय काही सर्वांपेक्षा वेगळे नाही. त्यांच्याप्रमाणे आम्ही इतर सर्व क्रीडा महासंघांनाही सर्वोत्तम दर्जाच्या सुविधा देऊ. त्यामुळे बीसीसीआयने देखील आमचे सर्व नियम आणि अटी पाळायला हव्यात.'' 

बीसीसीआय नरमले 
उत्तेजक सेवन प्रकरणात नाडाशी सहकार्य करण्यास सुरवातीला बीसीसीआयचा तीव्र विरोध होता. आम्ही स्वायत्त आहोत. सरकारच्या निधीवर अवलंबून नाहीत. राष्ट्रीय क्रीडा महासंघ असण्याचा प्रश्‍नच येत नाही, असा होरा त्यांनी सातत्याने ठेवला होता. मात्र, आता बीसीसीआयला नरमाईने घ्यावे लागले आहे. त्यांनी या संदर्भातील सर्व नियम अटी आणि शर्ती मान्य केल्या. जोहरी म्हणाले,"आम्ही काही प्रश्‍न त्यांच्यासमोर उपस्थित केले होते. त्यांनी त्याची समाधानकारक उत्तरे दिली. त्यामुळे आम्ही त्यांच्या सर्व नियम, अटी आणि शर्ती स्विकारल्या आहेत. चाचणीसाठी आवश्‍यक शुल्क भरण्याचीही आमची तयारी आहे.'' 
दौऱ्यांना परवानगी 

बीसीसीआयने नाडाच्या अटी आणि शर्ती स्वीकारल्यानंतर लगेचच दक्षिण आफ्रिका अ आणि त्यांच्याच महिला संघाच्या भारत दौऱ्यास क्रीडा मंत्रालयाकडून मान्यता मिलाली. सरकारकडून मान्यता मिळाल्याचे जोहरी यांनी बैठकीनंतर सांगितले. 

माहितीच्या अधिकाराखाली ? 
नाडाच्या अटी मान्य केल्यानंतर सहाजिकच आता "बीसीसीआय'ला माहितीच्या अधिकाराखाली यावे लागणार ही चर्चा जोर धरू लागली. पण, जोहरींनी या विषयावर बोलणे टाळले. ते म्हणाले,""माहितीचा अधिकार हा वेगळा मुद्दा आहे. आजच्या बैठकीत या विषयावर चर्चा झाली नाही. चर्चा फक्त आणि फक्त उत्तेजक सेवन चाचणीसंदर्भातच झाली.'' 

काय करावे लागणार 
-प्रत्येक क्रिकेटपटूला संभाव्य तीन कतारखांसह आपला ठावठिकाणा द्यावा लागणार 
-त्यानुसार "नाडा'च्या अधिकाऱ्याला नमुना देण्यासाठी उपलब्ध रहावे लागणार 
हे न केल्यास 
-लिहून दिलेल्या तारखेस उपलब्ध न राहिल्यास आचारसंहितेचा भंग केल्याचा आरोप 
-यासाठी एक वर्ष बंदीच्या कारवाईला सामारे जावे लागणार 
 

आम्ही प्रत्येक क्रीडा महासंघाला उत्तेजक चाचणी संदर्भात अद्यावत सुविधा देतो. "बीसीसीआय' या सर्वांपेक्षा वेगळे नाही. त्यांना जे नियम अटी आहेत, तेच "बीसीसीआय'ला देखील पाळावे लागतील. 
-राधेश्‍याम झुलानिया, केंद्रिय क्रीडा सचिव

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Lok Sabha 2024: मतदान केंद्रांना नायलॉनच्या जाळ्यांचे कवच, 101 वाघ असलेल्या जंगलात असं पार पडणार वोटींग

Latest Marathi News Update: पुण्यात १० मे रोजी राज ठाकरेंची सभा; मोहोळ यांचा करणार प्रचार

ICC Champions Trophy 2025 : चॅम्पियन्स ट्रॉफी खेळण्यासाठी भारत पाकिस्तानात जाणार? बीसीसीआयनं स्पष्टच सांगितलं

Viral Video: 'बाबा वारले,आई सोडून गेली..' रोल विकणाऱ्या १० वर्षांच्या मुलाची हिंमत पाहून भारावले आनंद महिंद्रा, केली मोठी घोषणा

Bomb Hoax in 16 Schools: मतदानादिवशी 16 शाळांना बॉम्बनं उडवून देण्याची धमकी! रशियातून आला ईमेल ? पोलिसांचं धाबं दणाणलं

SCROLL FOR NEXT