BCCI
BCCI SAKAL
क्रीडा

BCCI : च्या उत्पन्नात वाढ! 2022-23 या आर्थिक वर्षातील महसुलात २१९८.२३ कोटी रुपयांची वाढ

सकाळ वृत्तसेवा

पणजी - भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या (बीसीसीआय) २०२२-२३ या आर्थिक वर्षातील महसुलात २१९८.२३ कोटी रुपयांची वाढ झाल्याची माहिती सोमवारी आमसभेत देण्यात आली.इंडियन प्रीमियर लीगच्या (आयपीएल) नियमन परिषदेवर अरुण धुमल व अविषेक दालमिया यांची बिनविरोध फेरनिवड झाली, तर माजी कसोटीपटू प्रज्ञान ओझा भारतीय क्रिकेटपटू संघटनेचा प्रतिनिधी या नात्याने परिषदेतून पायउतार झाला.

बीसीसीआय’ची ९२वी वार्षिक आमसभा सोमवारी उत्तर गोव्यातील वागातोर येथे झाली. आमसभेला प्रज्ञान ओझा याच्या निर्णयाची माहिती देण्यात आली. ओझा याच्या जागी लवकरच आयसीए प्रतिनिधी नियुक्त केला जाईल. प्राप्त माहितीनुसार, ओझा याने वैयक्तिक कारणास्तव पद सोडत असल्याचे कळविले आहे. आमसभेत महिला प्रीमियर लीगसाठी (डब्ल्यूपीएल) वेगळी परिषद नियुक्त करण्याचा मात्र निर्णय झाला नाही.

देशांतर्गत क्रिकेट स्पर्धेत दुसऱ्या राज्याकडून ‘पाहुणा’ (व्यावसायिक) क्रिकेटपटू या नात्याने खेळणाऱ्या खेळाडूस अतिरिक्त मोबदला घेता येणार नाही. यासंबंधी निर्णय बीसीसीआय आमसभेत झाला. या खेळाडूंना करार करणारी राज्य क्रिकेट संघटना अतिरिक्त मोबदला आता देणार नाही. प्रत्येक राज्य संघटना मोसमासाठी तिघा ‘पाहुण्या’ क्रिकेटपटूंना करारबद्ध करू शकते. बीसीसीआयच्या आमसभेत झालेल्या निर्णयानुसार, या व्यावसायिक खेळाडूंना इतर प्रथम श्रेणी क्रिकेटपटूंइतकीच प्रमाणित सामना शुल्क मिळेल. हा नियम आगामी मोसमात लागू होईल.

बीसीसीआय आमसभेने लोकपाल व नैतिकता अधिकारी निवृत्त न्यायमूर्ती विनीत सरन यांना मुदतवाढ देण्याचाही निर्णय घेतला.

‘बीसीसीआय’ला मिळाला ६,५५८ कोटींचा महसूल

माहितीनुसार, बीसीआय आमसभेत खजिनदार आशिष शेलार यांनी सध्याच्या आर्थिक वर्षात मंडळाने ६,५५८.८० कोटी रुपयांचा महसूल प्राप्त केल्याची माहिती दिली. २०२१-२२ आर्थिक वर्षात बीसीसीआयचा महसूल ४,३६०.५७ कोटी रुपये इतका होता. क्रिकेट प्रशासन चालविण्यासाठी बीसीसीआयकडून ईशान्य भागातील क्रिकेट संघटनांना प्रतिवर्षी १२.५ कोटी रुपये, तर पुदुचेरीला १७.५ कोटी रुपये अनुदान देण्याचा निर्णयही आमसभेत झाला.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Lok Sabha Election Exit Poll 2024: 'हा तर सरकारी एक्झिट पोल...', निकालांचा कल हाती आल्यानंतर काँग्रेसची पहिली प्रतिक्रिया

Lok Sabha Election Exit Poll Results 2024 : एक्झिट पोलमध्ये देशात तिसऱ्यांदा NDA ची सत्ता; INDIA आघाडीला किती जागा मिळणार?

Loksabha election 2024 Exit Poll : एकच पठ्ठ्या म्हणतोय मोदी चारशेपार होतील! तेही घटकपक्षांना धरुन; काय आहे एक्झिट पोलची आकडेवारी?

Mumbai News : महिला प्रवाशांची रेल्वेला साथ; सुट्टी किंवा वर्क फ्रॉम होममुळे महिला डब्यात तुरळक गर्दी

OpenAI Robotics Comeback : लवकरच तुमच्या भेटीला येतोय 'AI रोबोट' ; प्रगत तंत्रज्ञान घेऊन OpenAIचं पुन्हा पदार्पण

SCROLL FOR NEXT