Cheteshwar Pujara Duleep Trophy  esakal
क्रीडा

Cheteshwar Pujara : टायगर अभी जिंदा हैं! चेतेश्वर पुजाराने निवडसमितीला दिलं चोख प्रत्युत्तर

अनिरुद्ध संकपाळ

Cheteshwar Pujara Duleep Trophy : भारताचा मधल्या फळीतील फलंदाज चेतेश्वर पुजाराला 12 जुलैपासून सुरू होणाऱ्या वेस्ट इंडीज विरूद्धच्या कसोटी मालिकेसाठी भारतीय संघातून वगळण्यात आले आहे. चेतेश्वर पुजारा हा इंग्लंडमध्ये ऑस्ट्रेलियाविरूद्ध झालेल्या WTC Final मध्ये खेळला होता. मात्र त्याला या दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेसाठी संघात स्थान देण्यात आलेले नाही.

संघातून वगळण्यात आलेला चेतेश्वर पुजारा हा देशांतर्गत स्पर्धांमध्ये खेळतोय. तो सध्या दुलीप ट्रॉफीमध्ये खेळताना दिसतो. त्याने दुलीप ट्रॉफीमध्ये आपला फॉर्म पुन्हा मिळवला आहे. पश्चिम विभागाकडून खेळणाऱ्या चेतेश्वर पुजाराने मध्य विभागाविरूद्ध सुरू असलेल्या सामन्यात शतकी खेळी केली. त्याचे हे प्रथम श्रेणी क्रिकेटमधील 60 वे शतक होते.

पुजाराची सावध खेळी

चेतेश्वर पुजाराने दुलीप ट्रॉफीच्या सेमी फायनल सामन्यात पश्चिम विभागाकडून फलंदाजी करताना अत्यंत सावध फलंदाजी केली. त्याने 219 चेंडूत आपले शतक पूर्ण केले. या सामन्यात तो मोठी खेळी करण्याच्या इराद्यानेच उतरला होता.

पुजाराचे हे प्रथम श्रेणी क्रिकेटधील साठावे शतक होते. त्याने हा माईलस्टोन 253 सामन्यात पार केला. या शतकी खेळीच्या जोरावर पुजाराने निवडसमितीला चांगलेच प्रत्युत्तर दिले. निवडसमितीने पुजाराला डावलून यशस्वी जैसवाल आणि ऋतुराज गायकवाड या दोन युवा खेळाडूंना कसोटी संघात निवडले.

(Sports Latest News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ashadhi Wari: विदर्भातून १५९४ मध्ये निघाली पहिली पालखी; १९३८ दिंड्या पंढरपुरात,रुक्मिणी संस्थान नंतर चंदाजी महाराज दिंडीचा समावेश

Elon Musk New Party: इलॉन मस्क स्थापन करणार अमेरिकेतील तिसरा सर्वात मोठा पक्ष, डोनाल्ड ट्रम्प यांचा फायदा होणार की नुकसान?

Ashadhi Ekadashi: देहेडच्या पुरातन वटवृक्षावर ‘कान्होपात्राची महावेल’;भोकरदन तालुक्यातील विठ्ठल भक्त दर्शनासाठी करतात गर्दी

Ashadhi Wari: पंढरपूरला चातुर्मासात रोज कीर्तनाची साडेतीनशे वर्षांची परंपरा

Flight Cancelled : तीन तासांची प्रतीक्षा अन् विमान रद्द

SCROLL FOR NEXT